जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / माझं राज्य संकटात, मला हजर व्हावं लागेल, आईच्या पार्थिवाला अग्नी देऊन प्रांताधिकारी दीड दिवसात कर्तव्यावर!

माझं राज्य संकटात, मला हजर व्हावं लागेल, आईच्या पार्थिवाला अग्नी देऊन प्रांताधिकारी दीड दिवसात कर्तव्यावर!

माझं राज्य संकटात, मला हजर व्हावं लागेल, आईच्या पार्थिवाला अग्नी देऊन प्रांताधिकारी दीड दिवसात कर्तव्यावर!

स्वतःच्या आईच्या निधनानंतर फक्त दीड दिवसात प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे कामावर हजर झाले. त्यांच्या कर्तव्यतत्परतेची दखल शासनानेही घेत त्यांना आभार आणि सांत्वनाचं पत्र पाठवण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नगर, 28 मार्च : Coronavirus चा राज्यात कहर सुरू असताना शासकीय सेवेतले अधिकारी दिवस-रात्र विसरून कामाला प्राधान्य देत आहेत. असंच एक उदाहरण संगमनेरमध्ये दिसलं. तिथले प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या आईचं निधन झालं. त्यांना हे दुःखद वृत्त 24 मार्चला समजलं. त्यानंतर अवघ्या दीड दिवसात ते गावी जाऊ आईचे अंत्यसंस्कार करून 26 मार्चला कामावर रुजू झाले. इकडे सगळं जग संकटात आहे आणि राज्यातल्या एका प्रांताला सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे याची जाणीव असल्यामुळे डॉ. मंगरुळे यांनी स्वतःचं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत कमीत कमी वेळात कर्तव्यावर हजर व्हायला प्राधान्य दिलं. जळगावातील पाचोरा तालुक्यात डॉ. मंगरुळे यांचं मूळ गाव आहे. आईच्या मृत्यूची बातमी समजताच ते स्वतःच्या खासगी वाहनाने नाशिकला आणि तिथून गावी पोहोचले. अंत्यसंस्कार आणि विधी आटोपून लगेगच दुसऱ्या दिवशी कामावर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात संममनेरला हजर झाले. सावधान! महाराष्ट्रात वृद्धांपेक्षा तरुणांना Coronavirus बनवतोय आपला शिकार वैयक्तिक दुःख वेगळं आणि देशकार्य आणि कर्तव्य वेगळं याचं एक वेगळं उदाहरण डॉ. शशिकांत यांनी घालून दिलं. त्यांच्या कर्तव्यतत्परतेची दखल राज्यशासनाने घेतली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना वैयक्तिक सांत्वन करणारं आणि त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिल्याबद्दल आभार मानणारं पत्र लिहिलं आहे. या पत्रात भुजबळ म्हणतात, “संपूर्ण विश्व कोरोनाचा मुकाबला करीत असल्यामुळे मातृशोक आणि वैयक्तिक, कौटुंबिक दुःख विसरून आपल्या कर्तव्यास दिलेले प्राधान्य याची शासन दखल घेत आहे.” हनीमूनसाठी गेले आणि पैसे संपले; मुंबई, पुण्यासह 27 नवविवाहीत जोडपी परदेशात अडकली हे दुःख पेलण्याची शक्ती ईश्वर आपणास आणि कुटुंबीयांस देवो. आपल्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत… “, असं लिहून भुजबळांनी डॉ. मंगरुळे यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात