हनीमूनसाठी गेले आणि पैसे संपले; मुंबई, पुण्यासह 27 नवविवाहीत जोडपी परदेशात अडकली
हनीमूनसाठी गेलेल्या जोडप्यांना कोरोनाचा फटका. हॉटेलमधूनही काढले बाहेर, कुटुंबियांनी सरकारकडे केली मदतीची मागणी.
|
1/ 8
कोरोनाव्हायरस या जागतिक धोक्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहे.
2/ 8
यामुळे देशातील 27 नवविवाहित जोडपी इंडोनेशिया येथील बाली या बेटावर अडकली आहेत.
3/ 8
हनीमून ट्रीपवर गेलेली ही 27 नवविवाहित जोडपी बाली येथील बेटावर अडकली असून, त्यांच्या घरच्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
4/ 8
मुख्य म्हणजे कोरोनामुळे इंडोनेशियातील सर्व हॉटेल रिकामी करण्यात आली आहेत. त्यामुळे या जोडप्यांना राहण्यासही जागा नाही आहे.
5/ 8
13 मार्च रोजी मुंबईहून ही जोडपी इंडोनेशियाला रवाना झाली होती. मलिंडो एअरलाइन्सने ही जोडपी इंडोनेशियाला पोहचली.
6/ 8
यात, राजस्थान ,जयपुर, हैदराबाद , केरळ , पंजाब, आंध्र प्रदेश, मुंबई, पुणे , दिल्ली , तमिळनाडु , मोहाली ,उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील तब्बल 27 जोडपी आहेत.
7/ 8
हनीमूनसाठी गेलेल्या या जोडप्यांनी आपले व्हिडीओ कुटुंबाना पाठवले आहे.
8/ 8
या व्हिडीओच्या मदतीने कुटुंबियांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.