Home /News /maharashtra /

काँग्रेसला धक्का, मंत्रिपद नाकारल्याने दिग्गज आमदार सोडणार पक्ष

काँग्रेसला धक्का, मंत्रिपद नाकारल्याने दिग्गज आमदार सोडणार पक्ष

'गेली चाळीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि पक्षवाढीसाठी काम करणाऱ्याच्या निष्ठेचं हेच फळ का, पक्षनिष्ठेची नियमावली सांगा आणि त्यात आम्ही कुठे कमी पडलो हे देखील दाखवून द्या.'

  संदीप राजगोळकर, कोल्हापूर,  : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झालेल नाराजी नाट्य कोल्हापुरात देखील पाहायला मिळतय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर पक्षांना मंत्रिपदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात पक्षश्रेष्ठींनी टाकलीय. यामुळं पी.एन.समर्थक नाराज आहेत. गेली चाळीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदार पी. एन. पाटील यांच्या पक्ष निष्ठेचं हेच फळ का असा सवाल करत पक्षनिष्ठेची नियमावली सांगा आणि त्यात आम्ही कुठे कमी पडलो हे देखील दाखवून द्या असा आक्रमक पवित्रा पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर पीएन समर्थकांचा बुधवारी मेळावा झाला. यात सर्व कार्यकर्त्यांना पाटील यांना पक्ष सोडण्याचं आवाहन केलंय. या मेळाव्यात पक्षात राहण्याबद्दल आमदार पी. एन. पाटील यांना फेरविचार करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून धरण्यात आला. त्यामुळे पाटील हे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तसं झालं तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो. दरम्यान, खातेवाटपवार काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज चर्चा झाली या चर्चेतून अंतिम तोडगा काढून खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता असल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्याशी रात्रीत बोलणे झाले असून त्यांचा सन्मान करण्यात येईल, असेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष हे कुटुंब असून त्या पद्धतीने आमदार थोपटे यांचा विचार केला जाईल. तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे मंत्रिपद कमी वाट्याला आल्याचे थोरातांनी सांगितले. #BREAKING: वर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांची ठाकरेंवर 'मातोश्री'वरून जहरी टीका दरम्यान, मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली होती. मात्र, आमदार थोपटे यांनी या तोडफोडीची कल्पना नसल्याचे सांगत या घटनेचा निषेध केला. या प्रकारानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. संग्राम थोपटे यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

  संजय राऊत आणि उद्धव ठाकरेमध्ये 'का रे दुरावा..?', फेसबुक पोस्टमुळे चर्चेला ऊत

  बाळासाहेब थोरात म्हणाले, संग्राम थोपटे हे चांगला कार्यकर्ता आहे. उत्तम आहे. त्यांच्या मागील पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. त्यांचे वडीलही मंत्रिमंडळात होते. मात्र, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे वाट्याला आलेल्या जागांचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत आहे. थोपटे यांना मंत्रिपद देऊ शकलो नसलो तरी त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Maharashtra cabinet expansion

  पुढील बातम्या