इंदूर, 6 मार्च : मध्यप्रदेशात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या वाढती प्रकरणं पाहता मध्य प्रदेश सरकारनं महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगितलं की, शुक्रवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रालयात कोरोनाच्या समीक्षा बैठकीदरम्यान यासंबंधित निर्देश दिले.
समीक्षा बैठकीत शिवराज सिंह म्हणाले की, भोपाळ, इंदूर, जबलपूर, बैतूल, छिंदवाडा, उज्जेन आणि महाराष्ट्राशी जवळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मध्य प्रदेशातील कोरोनाची स्थिती बिघडू नये यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आणणं अनिवार्य असेल. रिपोर्टच्या आधारावर प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाईल. (Restrictions imposed on passengers in Maharashtra by neighboring state)
स्थिती बिघडल्यास भोपाळ-इंदूरमध्ये नाइट कर्फ्यू
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या सीमेवर कडक तपासणी केली जाईल. चौहान यांनी प्रदेशातील महाराष्ट्र सीमेला लागून असलेल्या सर्व जिल्ह्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे. भोपाळ आणि इंदूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. ते म्हणाले की, जर पुढील तीन दिवसात यात घट झालेली दिसली नाही तर 8 मार्चपासून भोपाळ आणि इंदूरमध्ये नाइट कर्फ्यू लागू करण्यात येईल.
हे ही वाचा-निवडणूक आयोगाचा आदेश, कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरुन हटवा पंतप्रधानांचा फोटो
इंदूरमध्ये ब्रिटेनमधील नव्या व्हायरसपासून संक्रमित झालेले 6 जणं सापडले
यापूर्वी इंदूरचे जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी शुक्रवारी सांगितलं होतं की, जीनोम सीक्वेंसिंगसाठी तब्बल 100 लोकांचे नमुने दिल्लीला पाठविण्यात आले होते. यापैकी 6 ब्रिटेनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसशी संबंधित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Madhya pradesh