विरेंद्र उत्पात, पंढरपूर 25 ऑक्टोंबर : निवडणुकीत आपला नेता विजयी होण्यासाठी अनेक कार्यकर्ते जीवाचे रान करतात. अशाच एका कार्यकर्त्यांने आपला नेता विजयी झाल्यानंतर चक्क 18 किलोमिटर दंडवत घालत नवस पूर्ण केला. सांगोला मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या सुपली गावातील बापू जावीर या तरुणाने पाटील आमदार झाले तर दंडवत घालेल असा नवस केला होता. पाटील विजयी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या कार्यकर्त्याने 18 किलोमीटर दंडवत घालत नेत्यासाठी केलेला नवस आज पूर्ण केला. सांगोला मतदार संघात अत्यंत चुरश होती यामध्ये शिवसेनेचे शहाजी बापू पाटील विजयी होऊ दे मी माझ्या गावापासून विठ्ठल रूक्मिणी मंदिरा पर्यंत दंडवत घालीन असा नवस केला होता. ‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी काकूंची मोर्चेबांधणी! गुरुवारी मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेचे शहाजी बापू पाटील हे अवघ्या 674 मतांनी विजयी झाले. विजयानंतर या तरूणाने आज सकाळी दंडवताला सुरूवात केली आणि 18 किलो मीटर दंडवत घालत विठ्ठल मंदिरापर्यंत जात आपण पण पूर्ण केला. शहाजी बापू पाटील हे आधी काँग्रेसमध्ये होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या या आमदाराचा फोटो होतो व्हायरल महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेत तरुणांचं जसं प्रतिनिधीत्व जास्त आहे. तसच विविध क्षेत्रातल्या अनेक नेत्यांनीही विधानसभेत प्रवेश केलाय. यात ग्रामीण भागातल्या अनेक नेत्यांनीही आपल्या वैशिष्ट्यांनी विधिमंडळात वेगळी ओळख निर्माण केली. निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत दिंडोरीचे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी बाजी मारलीय. निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणं हे तसं कठीण काम असतं मात्र त्यांनी शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार भास्कर गावीत यांचा 60 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केलाय. हाडाचे शेतकरी असलेल्या झिरवळ यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. झिरवळांचा हा जुना पण आमदार असतानाचा तो फोटो असून ते नांगरणी करत असल्याचं त्यात दिसतंय. पाच वर्ष आमदार राहिल्यानंतरही त्यांचा हा साधेपणा लोकांना भावलाय. ‘तुफान’ गाजलेल्या त्या पाऊस भाषणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केला खुलासा! दिंडोरी मतदारसंघातून झिरवळ यांनी शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावीत यांचा 60 हजार 813 मतांनी पराभव केला. पाच वर्षानंतर त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झालीय. उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी आपला व्यवसाय हा शेती आणि पशूपालन असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.