'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी काकूंची मोर्चेबांधणी!

प्रत्येक अपक्षाला ठरवून संपर्क केला जात असून जास्तित जास्त संख्या जमविण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 06:09 PM IST

'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी काकूंची मोर्चेबांधणी!

हैदर शेख चंद्रपूर 25 ऑक्टोंबर : विधानसभांचे निकाल लागल्यानंतर भाजपला अपेक्षीत संख्याबळ गाठता आलं नाही. राजकारणात संख्याबळ नसेल तर शक्ती कमी होते याचा गेल्या पाच वर्षांचा अनुभव पाठिशी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकाल लागत असतानाच अपक्ष म्हणून बंडखोरी करत विजय मिळवलेल्या उमेदवारांना संपर्क करायला सुरुवात केली होती. याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.  भाजप आणि शिवसेनेला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतरही संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपने खास रणनीती आखली आहे. प्रत्येक अपक्षाला ठरवून संपर्क केला जात असून जास्तित जास्त संख्या जमविण्याचा मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीसांचं बळ वाढावं यासाठी आता त्यांच्या काकू आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनीही मोर्चेबांधणी सुरू केलीय.

सोनिया गांधींचा शरद पवारांना खास फोन, शुभेच्छा देताना म्हणल्या...

शोभाताई फडणवीस यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची आज सकाळी भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. सकाळी शोभाताई जोरगेवार यांच्या घरी गेल्या आणि त्यांचं अभिनंदन केलं. जोरगेवार हे कुठल्या पक्षात नसले तरी त्यांची भाजपसोबत जवळीक होती. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे.  शोभाताईंनी जोरगेवार यांना भाजपचं तिकीट मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे त्यांनी चंद्रपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

'तुफान' गाजलेल्या त्या पाऊस भाषणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केला खुलासा!

भेटीनंतर शोभाताईंनी कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही. मात्र त्यांची ही भेट जोरगेवार यांचा पाठिंबा मिळविण्यासाठीच होती अशी माहिती सूत्रांनी दिलीय. जोरगेवारही भाजपला पाठिंबा देतील अशी शक्यताही व्यक्त केली जातेय. जिरगेवार यांनी भाजपचे 2 वेळा आमदार राहिलेले  नाना शामकुळे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

Loading...

काय म्हणाले मुख्यमंत्री?

गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, जनेतेनं अतिशय मोठा निर्णय दिला असून तो आम्ही मान्य करतो. सरकार स्थापनेसाठी राज्यातल्या जनतेनं आम्हाला कौल दिलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मागच्या वेळेसपेक्षा काही जागा कमी असल्या तरी आमचा स्ट्राइक रेट अतिशय चांगला आहे असंही त्यांनी सांगितलंय. बंडखोरीमुळे भाजपला फटका बसला असल्याचं त्यांनी मान्य केलं. जे बंडखोर निवडून आले त्यातल्या अनेकांशी माझं बोलणं झालं असून किमान 15 लोकांनी मला पाठिंबा देण्याचं मान्य केलं असा खुलासाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आमचं ठरलं असून त्याच प्रमाणं पुढे जाऊ असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...