जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तुफान' गाजलेल्या त्या पाऊस भाषणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केला खुलासा!

'तुफान' गाजलेल्या त्या पाऊस भाषणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केला खुलासा!

'तुफान' गाजलेल्या त्या पाऊस भाषणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केला खुलासा!

‘पाऊस थांबायला तयार नव्हता आणि लोक जायला तयार नव्हते. लोकांना भाषण ऐकायचं होतं.’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 25 ऑक्टोंबर : विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काय गाजलं असेल तर ते साताऱ्यातलं शरद पवारांचं पावसातलं भाषण. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी पवारांनी साताऱ्यात सभा घेतली होती. त्या सभेच्यावेळी पावसानेही हजेरी लावली. सभा होईल की नाही अशी शंका कार्यकर्ते आणि इतर नेत्यांच्या मनात होती. मात्र पवारांनी त्या पावसाला अंगावर घेत कार्यकर्त्यांची मनं जिंकली. आणि सोशल मीडियावर पवारांचं हे पाऊस भाषण ‘तुफान’ व्हायरल झालं. त्या भाषणाने राष्ट्रवादीला मोठा आधार दिला. त्या भाषणावर इतर सगळे बोलले मात्र पवार फारसे बोलले नाहीत. निकाल लागल्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शरद पवार म्हणाले, त्या दिवशी ढगाळ वातावरण होतं. पावसाची शक्यताही होती. मात्र ठरलेली सभा घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. बोलायला सुरुवात केली आणि पाऊस सुरू झाला. सुरुवातीला रिमझीम असणारा पाऊस वाढला आणि लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या. पाऊस थांबायला तयार नव्हता आणि लोक जायला तयार नव्हते. लोकांना भाषण ऐकायचं होतं. त्यामुळे मीही भाषण पूर्ण केलं. त्या भाषणाचा निश्चितच राष्ट्रवादीला फायदा झाला. हे भाषण फक्त साताऱ्यापुरता मर्यादीत न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं. अमित शहांकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, दिवाळीनंतर होणार महत्त्वपूर्ण बैठक सोनियांचा शरद पवारांना फोन सगळं प्रतिकूल वातावरण, एक्झिट पोल्सनं दिलेल्या कमी जागा, यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात अतिशय निराशेचं वातावरण होतं. मात्र जसे निकाल यायला लागले तसे भाजपच्या तोंडचं पाणी पळालं. जे दावे करण्यात येत होते तसं काही घडत नव्हतं. तर काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीने सरस कामगिरी करत परिस्थिती बदलविण्याची ताकद कायम असल्याचं शरद पवारांनी दाखवून दिलं. यामुळेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पवारांना खास फोन करून त्यांचे आभारही मानले आणि आपल्या भावनाही व्यक्त केल्या. VIDEO: भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची मुसंडी; ‘या’ जिल्ह्यात सुपडासाफ वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार यांनी निवडणुकीत बाजी पलटवून लावली. साताऱ्यातली पावसातली सभा तर देशभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. पवारांच्या या मेहनतीचा फायदा काँग्रेसलाही झाला. त्यामुळे काँग्रेसची इभ्रत वाचली. त्यामुळे सोनिया गांधी यांनी शरद पवारांना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि निवडणुकीतल्या निकालांबद्दल आभारही मानले. पवारांनी जी मेहनत घेतली आणि रणनीती आखली त्याचा काँग्रेसलाही फायदा झाला अशा भावना सोनियांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरून चर्चाही झाली होती. मात्र निवडणुकीत राष्ट्रवादीनेच काँग्रेसला बळ दिल्याचं सिद्ध झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात