जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Update | पुण्यात अति मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडण्याआधी पाहा हवामान अपडेट्स

Weather Update | पुण्यात अति मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडण्याआधी पाहा हवामान अपडेट्स

Weather Update | पुण्यात अति मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडण्याआधी पाहा हवामान अपडेट्स

कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई : पुणेकरांनी आज घराबाहेर पडताना काळजी घ्या. कारण आज पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक आणि सातारा जिल्ह्यात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. पुण्यात पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह उर्वरित भागात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज आहे. तर अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर भागांसाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे असणार आहेत. या भागांमध्ये 23 आणि 24 ऑगस्ट रोजी अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने अलर्ट दिला आहे. विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ‘कोरोना’नंतरचा गणेशोत्सव, मुंबईतल्या मंडळांना पाळाव्या लागणार या अटी, BMC कडून नियमावली जाहीर गडचिरोलीत महापुरामुळे गोदाकाठी असलेल्या शेतात वाळूचे थर साचल्याचं पाहायला मिळतंय.. अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे परिसरात शेतीऐवजी सर्वत्र पाणीच दिसतंय.. त्यामुळे आता पुढील उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. गडचिरोली जिल्हयाला अलीकडेच महापुराचा फटका बसला होता. सिरोंचा तालुक्यात तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगड्डा कालेश्वर या सिंचन प्रकल्पामुळे पुरपरिस्थिती ओढवली होती. आता पुर ओसरल्यानंतर दिसत असलेले चिञ वेदनादायी असून गोदाकाठच्या शेती असलेल्या ठिकाणी वाळुचे थर साचले आहेत. सेल्फीसाठी गाडी बाजूला घेतली अन् स्विफ्ट कार ताम्हिणी घाटात 500 फूट दरीत कोसळली, 3 जण जागीच ठार देशात उत्तराखंड, हरियाणा, झारखंड आणि मध्य प्रदेश हिमाचल भागात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन आणि महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात