पुणे, 21 ऑगस्ट : सेल्फी (Selfie) काढण्याच्या नादामध्ये पाय घसरून किंवा तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आपण पाहिल्या असतील. मात्र, सेल्फीच्या मोहापायी कार रस्त्याच्या बाजूला घेत असताना गाडी थेट 500 फूट खोल ताम्हिणी घाटामध्ये (tamhini ghat) दरीत कोसळली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला.
पुणे-माणगाव या राष्ट्रीय महामार्गावर ताम्हिणी घाटात कारला भीषण अपघात झाला. कार सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. मंगळूरपीर वाशिम येथील पर्यटक MH 12 HZ 5535 या मारुती स्विफ्ट कारने पुण्यावरून देवकुंड येथे जात होते. 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 04.30 वाजण्याच्या दरम्यान कोंडेथर- सणसवाडी गावचे हद्दीत आली होती. त्यावेळी सेल्फी काढण्यासाठी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला पण तीव्र उतार आणि वळणावर ड्रायव्हरने ब्रेक मारला असता गाडी चिखलामध्ये स्लीप होऊन डोंगर उतारावरून घसरली आणि थेट 500 फूट खोल दरीत कोसळली, अशी माहिती समोर आली आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, यात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला. कार मधील ३ जण जागीच ठार झाले आणि 3 जण गंभीर जखमी झाल्याचे मणगाव पोलीस स्टेशनचे पो.नी.राजेंद्र पाटील यानी सांगितले.
(जत्रेत जाणं जीवावर बेतलं, राईड करताना झाला भयंकर अपघात, पाहा थरारक व्हिडीओ)
या अपघातात ऋषभ किशोर चव्हाण (वय- 24 ) कृष्णा पंडित राठोड (वय- 27) सौरभ श्रीकांत भिंगे (वय- 25) सर्व रा. मंगळूरपीर जि वाशीम अशी मृतांची नाव आहे. तर रोहन परशुराम गाडे (वय 26, ड्रायव्हर) प्रवीण गजानन सरकटे (वय- 26) रोहन किशोर चव्हाण (वय- 22 ) अशी जखमींची नाव आहे. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय माणगाव इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
(VIDEO: सुस्साट बाईकची कारला जोरदार धडक; तरुण फुटबॉल सारखा हवेत, त्यानंतर जे घडलं... )
अपघाची माहिती समजताच,माणगावचे पो.निरीक्षक राजेंद्र पाटील पोलीस आणि साळुंखे रेस्क्यू टीमसह तातडीने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातातील जखमीना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.