जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सूर्यदेवाचा प्रकोप, बुलडाण्यात सलग तिसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद

सूर्यदेवाचा प्रकोप, बुलडाण्यात सलग तिसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद

कडक ऊन 

कडक ऊन 

पाऊस कधी पडेल असं वाटत असतानाच आता बुलडाण्यात सलग तिसऱ्या दिवशी सूर्यदेवाचा प्रकोप पाहायला मिळाला.

  • -MIN READ Buldana,Maharashtra
  • Last Updated :

राहुल खंडारे प्रतिनिधी बुलडाणा : राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांत उष्णता वाढली आहे. त्यामुळे अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. रात्री झोप नाही आणि दुपारी बाहेर पडायची उष्णतेमुळे सोय नाही अशी अवस्था झाली आहे. घामाच्या धारा आणि नको जीव झाला आहे. पाऊस कधी पडेल असं वाटत असतानाच आता बुलडाण्यात सलग तिसऱ्या दिवशी सूर्यदेवाचा प्रकोप पाहायला मिळाला. सलग तिसऱ्या दिवशी ही बुलडाणा जिल्ह्यात तापमान चाळीशी पार गेला आहे. आजही खामगाव चे तापमान 44 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव दरवर्षी हॉट शहर म्हणून त्यांची नोंद होते त्यामुळे रखरखत्या उन्हाने जीवाची लाहीलाही होत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही खामगावचे तापमान चाळीशी पार आहे आजचे तापमान 44 इतके नोंदविले गेले असून उन्हाचा पारा चढता आल्याने रस्त्यावर ओस पडला आहे. रस्त्यावरून कुणी फिरत नसल्याने उन्हाने शहरात अघोषित संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण केली आहे.

मे महिना काढतोय चांगलाच घाम, पाहा आजचे संभाजीनगरमधील हवामान अपडेट
News18लोकमत
News18लोकमत

22 मे रोजी बुलडाण्यातील तापमान 47 अंश डिग्री सेल्सियसवर पोहोचलं होतं. 22 मे रोजी जिल्ह्यातील खामगाव शहराचे तापमान तब्बल 45 अंशा पलीकडे गेलं होतं. बुलडाण्यात सूर्य आग ओकताना पाहायला मिळत आहे. खामगाव शहरात कडाक्याच्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे.

मे महिना सोलापूरकरांचा घाम काढतोय, घराबाहेर पडण्याआधी आजचं तापमान पाहा

लोक घराबाहेर निघताना उन्हापासून बचावासाठी विशेष अशी खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत. वाढलेल्या या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांनी आपली महत्त्वाची कामे सकाळी किंवा उन उतरल्या नंतर करण्यास प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे रस्ते सामसूम झाले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक गर्मी खामगावात अनुभवायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात