सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी मे महिना उष्णतेचा नवा उच्चांक गाठताना दिसतोय. यंदा मे महिन्यात चाळीशीपार कायम आहे.
आज 23 मे रोजी कमाल तापमान 42.5अंश सेल्सिअस तर किमान तापमान 30 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सोलापुरात सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्ह वाढायला सुरुवात होत आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातासारखे प्रकार टाळण्यासाठी दुपारी बाहेर पडणे टाळावे.
शेतकऱ्यांनीही शेतीची कामे सकाळी व सायंकाळी करावीत. दुपारच्या उन्हात शक्यतो सावलीत राहावे. बाहेर पडलाच तर डोक्यावर टोपी, रुमाल किंव एखादे कापड घ्यावे. तसेच पाणी भरपूर प्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
वाढलेल्या तापमानाचा पशु-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. तसेच पक्षांसाठी काहीजण पाणी ठेवतानाही दिसत आहेत.