जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मान्सून आला रे! अंदमानच्या वेशीवर दाखल, महाराष्ट्रातही कधी येणार?

मान्सून आला रे! अंदमानच्या वेशीवर दाखल, महाराष्ट्रातही कधी येणार?

मान्सून आला रे! अंदमानच्या वेशीवर दाखल, महाराष्ट्रातही कधी येणार?

कोरोनाचं महासंकट असलं तरी शेतकऱ्यांना काहीसा दिसाला देणारी बातमी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मे : कोरोनाचं महासंकट असलं तरी शेतकऱ्यांना काहीसा दिसाला देणारी बातमी आहे. यंदाचा मान्यून वेळेत दाखल होणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मान्सून वेळेत केरळमध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण पश्चिम मान्सून अंदमान आणि केरळपासून दाखल होत मग पुढे उत्तर भारतात त्याचा प्रवास सुरु होतो. दक्षित पश्चिम मान्सून अंदमान समुद्रासह जवळपासच्या परिसरात दाखल झाला आहे. केरळमध्ये 5 जून पर्यात मान्सून दाखल होईल तर महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनचा सध्याचा प्रवास पाहता हवामान विभागाच्या अंदाजानुसार वेळेत दाखल होईल असं सांगण्यात येत आहे. केरळमध्ये मान्सून वेळेत दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळेत आगमन होतं. त्यावर पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते. शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची चातकासारखी वाट पाहात असतात. हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात गेल्या काही वर्षात सातत्यानं बदल होत आहेत. हे वाचा- धर्मापेक्षा माणुसकी मोठी! मुस्लिम बांधवांनी केले शीख मजुरावर अंत्यसंस्कार दिल्लीमध्ये मान्सून 23 जून ऐवजी 27 जून रोजी दाखल होईल तर मुंबईमध्ये 10 जून ऐवजी 11 ला दाखल होणार होता त्याऐवजी तो पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुर्तास नियोजित ज्या तारीख हवामान खात्याच्या मान्सून प्रवास जाहीर केल्या त्यानुसार मान्सून प्रवास सुरू आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून पाऊस सामान्य होईल. त्यानुसार 2020 मध्ये मान्सून सरासरीच्या 100 टक्के म्हणजे चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे वाचा- मनरेगासाठी 40हजार कोटींची अर्थमंत्र्यांची घोषणा,प्रवासी मजुरांना गावात मिळेल काम संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात