मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dahi Handi Celebrations : 'मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची हंडी भोडणार,' फडणवीसांचं ठाकरेंना चॅलेंज

Dahi Handi Celebrations : 'मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची हंडी भोडणार,' फडणवीसांचं ठाकरेंना चॅलेंज

दहीहंडीनिमित्त मुंबईच्या (Mumbai Dahi Handi) रस्त्यांवर उत्साह दिसत आहे, त्यातच महापालिका निवडणुका (BMC Election) तोंडावर आल्यामुळे नेते शक्तीप्रदर्शन करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबई आणि आसपासच्या भागातल्या वेगवेगळ्या दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 ऑगस्ट : दहीहंडीनिमित्त मुंबईच्या (Mumbai Dahi Handi) रस्त्यांवर उत्साह दिसत आहे, त्यातच महापालिका निवडणुका (BMC Election) तोंडावर आल्यामुळे नेते शक्तीप्रदर्शन करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबई आणि आसपासच्या भागातल्या वेगवेगळ्या दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत, यातल्या भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या दहिसरमधल्या दहीहंडीमध्ये फडणवीस यांनी ठाकरेंना चॅलेंज केलं आहे. मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असल्याचं फडणवीस म्हणाले. 'आता सर्व खुले खुले वाटत आहे, कारण आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी व गणेशोत्सव यावरील सर्व निर्बंध दूर झाले आहेत. याच प्रमाणे नवरात्री उत्सवही उत्साहात साजरा केला जाणार आहे. आता दहीहंडी उत्सवात सहभागी होणारे गोविंदा हे फक्त गोविंदा राहिले नाहीत, तर ते आता खेळाडू झाले आहेत. गोविंदा या खेळाडूंना सर्व सवलती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत. गोविंदांना मुख्यमंत्र्यांनी 10 लाखांचे विमा कवच व तर मुंबई भाजपाच्यावतीने आशिष शेलार यांनी 10 लाखाचे कवच दिले आहे, त्यामुळे गोविंदांना आता डबल विमा कवच मिळाले आहे', असं फडणवीस म्हणाले. दहीहंडी फोडल्यानंतर या हंडीमधील मलई आपल्याला सर्वांना वाटायची आहे. लवकरच मुख्यमंत्री आणि आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार आहोत आणि त्यामधील विकासाची मलई ही प्रत्येक शेवटच्या माणसांपर्यंत विकासाच्या रुपात पोहचविणार आहोत, असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 'आज आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. आज ख-या अर्थाने गोविंदांच्या आनंदाला उधाण आले आहे. राज्य सरकारने गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिल्याबद्द्ल गोविंदांच्यावतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल भाजपाचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राज्य सरकारने गोविंदांना विमा कवचही दिले, तसेच कोविडनंतर सुमारे २ वर्षांनी दही हंडी उत्सवावरील सर्व निर्बंध राज्य सरकारने दूर करुन गोविंदांसह राज्यातील कोट्यवधी नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण मिळवून दिला आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, कृपाशंकर सिंह, दहीहंडी उत्सवाचे आयोजक मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अशोकवन येथील दहिहंडी उत्सवात 1 लाख 11 हजार 111 रुपयांची दही हंडी लावण्यात आली होती. सुमारे 250 गोविंदांनी दही हंडीला सलामी दिली. विविध दहीहंडी पथकांना अनेक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Shivsena

    पुढील बातम्या