मुंबई, 04 मे: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Awtade) 3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर विजयी आणि पराजित दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलनं निवडणूक आयोगाला लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होतं आहे. या पत्रात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित पत्र लिहिणारे अॅड. नितीन माने यांच्याशी आमचा काही संबंध असं राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलं आहे. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालात नवीन ट्विस्ट आला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. हे वाचा- कंगनाची (Twitter) बोलती बंद! अभिनेत्रीविरोधात पोलिसात तक्रार दाखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या ट्विटमध्ये एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात म्हटलं की, अॅड. नितीन माने या नावाच्या व्यक्तीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेलचा काहीही संबंध नाही. त्यांना कोणतंही नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही वा त्यांनी दिलेल्या कोणत्याही निवेदनाशी अथवा तक्रारीशी लीगल सेलचा काहीही संबंध नाही, अशी माहिती लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी निवेदनात दिली आहे. अॅड. नितीन माने ही व्यक्ती स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेलच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची सदस्य असल्याचं भासवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
अॅड. नितिन माने नावाच्या व्यक्तीशी @NCPspeaks लिगल सेलचा काहीही संबंध नाही. त्यांना कोणतेही नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही वा त्यांनी दिलेल्या कोणत्याही निवेदनाशी अथवा तक्रारीशी सेलचा दूरान्वयानेही संबंध नाही, असे सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी जाहीर केले आहे. pic.twitter.com/GsDYhSZloQ
— NCP (@NCPspeaks) May 4, 2021
नेमकं प्रकरण काय ? अॅड. नितीन माने नावाच्या व्यक्तीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचं हुबेहुळ लेटरहेड तयार करून निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी पंढरपुरात पुन्हा निवडणुका घ्या, अशी मागणी केली आहे. शिवाय भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विधान परिषदतेचे विद्यमान आमदार असणऱ्या आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी त्यांच्या कारखान्यात काम करण्याऱ्या कामगारांना निवडणुकीच्या आधी तीन दिवस डांबून ठेवल्याचा गौप्यस्फोट देखील या पत्रात केला आहे. हे वाचा- ‘भाजपनं मतदारांना 3 दिवस डांबून ठेवलं, पंढरपुरात पुन्हा निवडणूका घ्या!’ NCP चं निवडणूक आयोगाला पत्र शिवाय भाजपला मतदान करा अन्यथा कामावरुन काढून टाकू अशी धमकीही भाजप नेत्यांकडून दिली असल्याचं संबंधित पत्रात नमूद करण्यात आलं होतं. पण या पत्रानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे.