मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...म्हणून लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाले, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

...म्हणून लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाले, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

जगातल्या मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश असलेल्या लोणारच्या सरोवराचं पाणी अचानक लाल-गुलाबी दिसू लागलं आहे.

जगातल्या मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश असलेल्या लोणारच्या सरोवराचं पाणी अचानक लाल-गुलाबी दिसू लागलं आहे.

जगातल्या मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश असलेल्या लोणारच्या सरोवराचं पाणी अचानक लाल-गुलाबी दिसू लागलं आहे.

बुलडाणा, 15 जून : बुलडाणा जागतिक लोणार सरोवराचा रंग लाल-गुलाबी झाला आहे. सध्या हा चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातले व्हिडिओ आणि फोटोही पोस्ट होत आहेत. लोणार सरोवराचा रंग लाल का झाला? यामागे नेमकं काय कारण आहे? हा लाल रंग जाऊन सरोवराला पूर्ववत स्वरुप येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही News 18 लोकमत च्य माध्यमातून थेट लोणार येथून नेरी (नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर) चे शास्त्रज्ञ प्रमुख डॉ. कुमार, डॉ मालदुरे व खडसे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सरोवराच्या गुलाबी लाल पाण्याबद्दल नेरी शास्त्रज्ञ डॉ. गजानन खडसे (सीनिअर प्रिंसिपल सायंटिस्ट) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  'पाण्यामध्ये असेलेल्या सजिवांना आणि पाण्याच्या क्षारतेतून (सलेनिटी) त्यांना उष्णता तसंच विरघळलेल्या स्वरूपाचा ऑक्सिजन मिळाला तर तिथे पिग्मेंटेशन होऊन रंग बदलतो. जर केरोटीन सारखे पिग्मेंटेशन तयार झाले तर त्याला लाल रंग प्राप्त होतो. जर शेवाळासारखी वनस्पती असली तर त्यामध्ये क्लोरोफीलमुळे हिरवा रंग प्राप्त होतो. तर या ठिकाणी लाल रंगाचे पिग्मेंटेशन तयार झाल्यामुळे व यावर्षी पाण्याची पातळी कमी असून क्षार जास्त प्रमाणात  असल्याने सरोवराला लाल रंग प्राप्त झाला असेल, असं मत  डॉ. गजानन खडसे यांनी व्यक्त केलं.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर थेट गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

तसंच, 'पावसाचे पाणी आल्यानंतर पाण्याचे डायल्युशन होऊन हा रंग नाहीसा होऊ शकतो. माझ्या माहिती प्रमाणे हे घाबरण्याचे कारण नाही. हे सरोवर जागतिक पातळीवर वारसा असल्याने याबद्दल सविस्तर अभ्यास करण्याकरीता नमुने नागपूर येथे घेऊन जाऊन सविस्तर अध्ययन करून याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आपल्याला प्राप्त होईल' असं यावेळी त्यांनी News 18 लोकमत सोबत बोलताना सांगितलं.

11 जूनपासून जगातल्या मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश असलेल्या लोणारच्या सरोवराचं पाणी अचानक लाल-गुलाबी दिसू लागलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेलं हे सरोवर जगभरातल्या भूगर्भ संशोधकांचा आणि भूगोल अभ्यासकांचा औत्सुक्याचा विषय आहे. अचानक निळ्या-हिरव्या सरोवराच्या पाण्याने रंग बदलल्याने भीतीमिश्रित आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Coronavirus : या राज्याने महाराष्ट्रातून आलेल्या व्यक्तींसाठी केला वेगळा नियम

जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाल्याने लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रूप पाहण्यासाठी एकच गर्दी करत आहे. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर याबाबत अनेकांच्या मनात कुतूहलसुद्धा निर्माण झाले.

संपादन - सचिन साळवे

First published:
top videos