न्यायालयाच्या आवारातच महिलेनं केला फैसला, वकिलांना केली मारहाण, पाहा हा VIDEO

न्यायालयाच्या आवारातच महिलेनं केला फैसला, वकिलांना केली मारहाण, पाहा हा VIDEO

हा वाद सोडविण्यासाठी वकील नवशाद यांचा साथीदार सहकारी वकील आला असता त्यास देखील या महिलेनं मारहाण केली

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 26 फेब्रुवारी : वकिलांशी झालेल्या जुन्या वादाच्या रागातून एका महिलेने थेट न्यायालयात जाऊन वकिलांना मारहाण करण्याची घटना भिवंडी न्यायालयात घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात परस्पर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अॅड. नवशाद सय्यद असं महिलेकडून मारहाण झालेल्या वकिलाचं नाव असून सदर वकिलाचे आठ महिन्यांपूर्वी 33 वर्षीय महिलेच्या पतीशी वाद झाला होता. त्यावेळी महिलेच्या पतीने पाच ते सहा इसमांसोबत वकील नवशाद सय्यद यांच्याशी वाद केला होता. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गंभीर गुन्ह्याची दखल घेत सदर महिलेच्या पतीस पोलिसांनी दहा दिवसांपूर्वी हद्दपार केलं आहे. या गोष्टीचा मनात राग धरून सदर हद्दपार आरोपीची महिला या वकिलाच्या शोधावर होती. अखेर आज थेट भिवंडी न्यायालयात येऊन तिने वकील नवशाद यास मारहाण केली.

हा वाद सोडविण्यासाठी वकील नवशाद यांचा साथीदार सहकारी वकील आला असता त्यास देखील या महिलेनं मारहाण केली सदर प्रकाराबाबत महिला आणि वकील यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात परस्पर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

First published: February 26, 2020, 10:10 PM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या