वर्धा, 5 जुलै: आचार्य विनोबा भावे यांच्या कर्तृत्वाने वर्धा जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. पवनार या गावी आचार्य विनोबांचा आश्रम असून त्याला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व आहे. देशविदेशातून अनेक पर्यटक, अभ्यासक या ठिकाणी भेट देत असतात. विनोबांच्या विचारधारेवर आजही पवनार आश्रमात अनेक कार्ये चालतात. त्यांनीच सुरू केलेली गोशाळा आजही सुरू आहे. गोशाळेत गोसंवर्धानाचे कार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेली गोशाळा आजही सुरू आहे. आश्रमाला भेट देणारे आवर्जून ही गोशाळा पाहतात. आता या गोशाळेत गाई, बैल, वासरू असे 31 गोवंश आहेत. आश्रमातील सेवक आणि सेविका या गोशाळेत काम करतात. देशी गाईंच्या संवर्धनासाठी या ठिकाणी काम केले जाते.
पवनार गोबर गॅस पवनार आश्रमामध्ये असलेल्या या गोशाळेतील शेणापासून गोबर गॅस बनविला जातो. आजही याच गोबर गॅसच्या साह्याने आश्रमात कार्यरत सदस्यांसाठीचे जेवण शिजवले जाते. पवनार गावातील काही नागरिक याठिकाणी सेवा देत आहेत. गोशाळेतील गायींचे रक्षण करून खाण्याची पिण्याची व्यवस्था याकडे ते लक्ष देतात. महात्मा गांधींच्या ‘आखरी निवास’चं होणार जतन, पाहा कसं सुरूय काम, Video दुधापासून बनवला जातो पेढा पवनार आश्रमात सर्व गाई देशी जातींच्याच ठेवण्यावर कटाक्ष आहे. या गोशाळेतील गाईचे दूध आश्रमातील सदस्यांसाठी वापरण्याची परंपरा कायम आहे. उरलेल्या दुधापासून तूप आणि पेढा देखील बनविला जातो. त्याची विक्री केली जाते. आचार्य विनोबा भावे यांच्या काळापासून सुरू झालेल्या या गोशाळेचे कार्य आश्रमातील सदस्य आज देखील पारंपरिक पद्धतीने करत आहेत. आश्रमाला भेट देणारे पर्यटक आश्रमासह गोशाळेची देखील माहिती जाणून घेत असतात.