मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /प्रेयसी बोलत नसल्याने प्रियकराचा राग अनावर; रस्त्यात गाठून केलं भयानक कांड; दोघेही रुग्णालयात

प्रेयसी बोलत नसल्याने प्रियकराचा राग अनावर; रस्त्यात गाठून केलं भयानक कांड; दोघेही रुग्णालयात

हिंगणघाट येथे प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न

हिंगणघाट येथे प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न

Wardha Crime : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे 22 वर्षीय तरुणाने 19 वर्षीय प्रेयसीला विषारी द्रव्य पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 31 जानेवारी : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे विषारी द्रव्य पाजून 19 वर्षीय प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही या गोष्टीचा राग मनात धरुन 22 वर्षीय तरुणाने हे कृत्य केलं. इतकंच नाही तर त्याने स्वत: देखील विषारी द्रव्य घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोघांनाही उपचारांसाठी सेवाग्राम रुग्णालात दाखल करण्यात आलं आहे. अमन निखार (वय 22 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. शनिवारी (28 जानेवारी) ही घटना घडली होती.

काय आहे प्रकरण?

अमन निखारने तरुणीला भेटण्यासाठी बोलावलं होतं. परंतु, ती सातत्याने नकार देत होती. त्यातच मागील आठवड्यात काही कामानिमित्त मैत्रिणीसोबत घराच्या बाहेर पडली. तरुणी कलोडे मंगल कार्यालय परिसरात आली असता या आरोपीने तिला वाटेत गाठलं. त्यानंतर तिला जबरदस्तीने आपल्या गाडीवर बसवून निर्जन स्थळी नेलं. माझ्याशी का बोलत नाहीस या कारणावरुन आरोपीने तरुणीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढला आणि रागाच्या भरात त्याने आपल्यासोबत आणलेलं विषारी द्रव्य तिला बळजबरीने पाजलं. दरम्यान तरुणाने देखील विषारी द्रव्य पीत स्वतःला देखील संपवण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती हिंगणघाटचे पोलीस निरिक्षक कांचन पांडे यांनी दिली.

वाचा - पुण्यात कोयता गँगचं लोण शाळेपर्यंत! मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर हल्ला

आरोपी तरुणावर गुन्हा दाखल

पीडितेची तक्रार आणि वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी माथेफिरु तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हिंगणघाट येथील ज्ञानेश्वर वॉर्डात राहणाऱ्या आरोपी अमन निखार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी तरुण अमन निखार याच्याविरुद्ध कलम 307, 328, 309 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत.

2020 मध्ये हिंगणघाटमध्ये घडलं होतं जळीत हत्याकांड

हिंगणघाट येथील प्रसिद्ध प्राध्यापिका जळीत हत्याकांड प्रकरणात मागच्याच वर्षी न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेवरील आरोप सिद्ध केले.  घटनेतील मृत प्राध्यापिका ही हिंगणघाटच्या स्व.आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी नियमितपणे 3 फेब्रुवारी 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहोचली. त्यानंतर नंदोरी चौकापासून काही अंतरावर कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे वाट पाहत होता. मनात राग ठेवून दुचाकीतील पेट्रोल अंगावर टाकून पीडितेला पेटवण्याचा बेत त्याच्या मनात होता. दिसताक्षणीच आरोपीने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिले. घटनेनंतर लगेच प्राथमिक उपचार करत गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत तिला नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत तिने 10 फेब्रुवारीला अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

First published:

Tags: Crime, Wardha