मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुण्यात कोयता गँगचं लोण शाळेपर्यंत! मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर हल्ला

पुण्यात कोयता गँगचं लोण शाळेपर्यंत! मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर हल्ला

पुण्यात कोयता गँगचं लोण शाळेपर्यंत!

पुण्यात कोयता गँगचं लोण शाळेपर्यंत!

पुण्यातील कोयता गँगची दहशत आता शाळेपर्यंत येऊन ठेपली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 31 जानेवारी : पुणे शहरात कोयता गँगची दहशत आता रस्त्यावरुन पार शाळेपर्यंत पोहचली आहे. आज शहरात अशाच एका धक्कादायक घटनेने खळबळ माजली आहे. प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. या वाद विकोपाला पोहचल्याने एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध नुतन मराठी विद्यालय (नुमवी) या शाळेत हा प्रकार घडला असून यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

काय आहे प्रकार?

पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या वादातून एका विद्यार्थ्यावर भरदिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आला. विद्यार्थ्याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला असून तो त्यात गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन तरुणाने या शाळकरी मुलावर हल्ला केला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ज्याच्यावर हल्ला झाला आहे, तो पद्मवती या भागात राहायला असून तो 12वीमध्ये शिक्षण घेत आहे. ज्याने हल्ला केला तो तुळशीबागेत काम करतो. हल्ला झालेला मुलगा आरोपी मुलाच्या मैत्रिणीशी बोलत बस स्टॉपला बसला होता. याचा राग त्याला आणि त्याने संबंधित विद्यार्थ्यावर कोयता उगारला आणि या हल्ल्यात त्याच्या शेजारी असलेल्या विद्यार्थ्याला देखील हा कोयता लागला. या हल्ल्यात तो देखील जखमी झाला आहे. या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा - पत्नीने रागात चावली नवऱ्याची जीभ, डोक्यालाही जखम; धक्कादायक प्रकरण आलं समोर

पुण्यात कोयता गँगची दहशत संपेना

पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत सुरू आहे. याविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. काही दिवसांपासून शहरातील हॉटेल, लॉज, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानर परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. सिंहगड रोड पोलिसांनी धायरी परिसरात राहणाऱ्या नीलेश शिवाजी गायकवाड (वय 35) याला अटक करुन त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले होते. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 43 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 145 कोयते, तलवारी अशी हत्यारे जप्त करण्यात आले होते. तर कोयता बनवणाऱ्या ठिकाणांवरुनही मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime, Pune