अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 19 मे: आपले आरोग्य सुदृढ राहावे असे सर्वांना वाटते. आपल्याला कुठलाही गंभीर आजार होऊ नये यासाठी नागरिक काळजीही घेत असतात. अनेक औषधी गुणधर्म असलेली झाडे आपल्या आजूबाजूला असतात. मात्र त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊन नागरिक त्या पानांचे रस पिण्यास प्राधान्य देत आहेत. वर्ध्यात गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी पहाटे 6 ते 8 च्या दरम्यान त्या पानांचे रस काढून विक्री केली जाते. वर्ध्यातील नागरिक देखील मोठ्या संख्येने हे रस आवर्जून पितात. दररोज मॉर्निंग वॉकला जाताना हे रस नागरिक सेवन करतात. या रसांचे अनेक फायदे सांगितले जातात. विविध आजारांवर हे रस उपयुक्त असून नागरिक त्याचा फायदा घेत आहेत. ही दुकाने पहाटेच दिसतात विक्री केले जाणाऱ्या पानांचा रस हा पहाटेच पिणे गरजेचे आहे. रस पिल्यानंतर काही वेळ काहीच न खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळे हे रस पहाटे पिणे महत्त्वाचे ठरते. याची विशेषता अशी आहे की, अनेक आजारांवर हे रस अतिशय फायदेशीर आहेत. विक्री केल्या जाणाऱ्या रसांमध्ये गव्हाच्या पानांचा रस, कोरफड आणि दुधीचा रस, आवळाचा रस, आलं आणि तुळशीचा रस, कडुनिंब आणि गुळवेल रसांचा समावेश आहे.
गुळवेल, आवळ्याच्या रसाला जास्त मागणी वर्ध्यात 10 रुपयांना एक ग्लास रस मिळतो. या रसांपैकी गव्हाच्या रोपाचा रस आणि आवळ्याचा रस सर्वात जास्त विक्री होतो. गव्हाच्या रोपांचा रस हा कॅन्सरसारख्या आजारावर उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. तसेच दुधी आणि कोरफड हा हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करतो. आवळा रस हा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. कडुनिंब आणि गुळवेल हा शुगरवर उपयुक्त आहे. तुळस आणि आल्याचा रस देखील आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असल्यामुळे या रसांची चव कडवट, तुरट जरी असली तरीही आरोग्याचा फायदा लक्षात घेता नागरिक ते वर्षानुवर्षे सेवन करीत आहेत. खई के पान…पण शुगर फ्रीवाला, सोन्याचा वर्ख असलेलं खास मधुमेह रुग्णांसाठी स्पेशल, कुठे? पाहा VIDEO घराच्या अंगणात औषधी झाडे रसविक्रेता मधुकर नरड यांनी स्वतःच्या घरी ही रोपे लावली आहेत. गव्हाचे रोप, गुळवेल, तुळस, आवळा यासारखी औषधी गुणकारी झाडांची छोटी बाग घरी तयार केली आहे. हा व्यवसाय सकाळी 2 ते 3 तासच सुरू असतो. मात्र नागरिक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत गेल्या अनेक वर्षांपासून या औषधी पानांचा रस सेवन करण्यासाठी दररोज दुकानात हजेरी लावतात.