वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 10 मार्च : शेतीचा शोध महिलांनी लावल्याचं सांगतिलं जातं. आताही बहुतांश शेतीच्या कामांत महिलांचे योगदान महत्त्वाचं असतं. आता कृषी संशोधनाच्या क्षेत्रातही महिला क्रांती घडवत आहेत. यवतमाळ शहरात राहणाऱ्या संगीता दीपक सव्वालाखे यांनी आपल्या कर्तृत्वाने हे सार्थ ठरवलं आहे. संगीता गेल्या 28 वर्षांपासून जैविक प्रयोगशाळेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्या सेंद्रीय खतांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीचा मंत्र देत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत.
अभ्यासासाठी गेल्यावर मिळाली प्रेरणा
संगीता या कृषि किट विज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या. रुलर एग्रीकल्चर वर्क एक्सपीरियंस प्रोग्रॅम अंतर्गत त्या शेतकऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे आणि जमिनीचेही नुकसान होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांची ही परिस्थिती बदलण्यासाठी त्या उपाय शोधू लागल्या. तेव्हा त्यांना जैविक शेती हा उत्तम पर्याय वाटला.
जैविक शेतीसाठी मोफत मार्गदर्शन
संगीता यांनी जैविक शेतीचा अभ्यास केला. 1994 ला यवतमाळमध्ये येऊन त्यांनी जैविक शेतीसाठी मोफत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जैविक शेतीसाठी विविध प्रयोग त्या करू लागल्या. 1995 मध्ये विदर्भ बायोटेक लॅबची स्थापना केली. या लॅबच्या माध्यमातून जैविक शेतीला लागणारे औषध त्यांनी तयार करण्यास सुरुवात केली.
30 लाखांचं पॅकेज सोडून सुरू केली स्ट्रॉबेरीची शेती, आता तरुणाची होतेय बम्पर कमाई!
सेंद्रीय शेतीचा शेतकऱ्यांना फायदा
जैविक आणि सेंद्रीय खतांच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी संगीता यांनी शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन सुरू केले. याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि आर्थिक फायदाही होऊ लागला.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
संगीता सव्वालाखे आणि विदर्भ बायोटेकला विविध सामाजिक संघटनांनी पुरस्कारांनी सन्मानित केले. यामध्ये काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही आहेत. 2002 ला WWSF या युनोस्कोशी लिंक असणाऱ्या स्वित्झर्लंडमधील संघटनेने 'वुमेन्स क्रियेटिव्हीटी इन रुरल' लाईफ हा अवार्ड दिला. तर 2004 ला यवतमाळ जिल्हा उद्योग पुरस्कार मिळाला. तसेच 2008 ला महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार (मिटकॉन पुणे) यांनी दिला आहे. या सोबतच अनेक सामाजिक संघटनानी देखील विविध पुरस्कार दिले आहेत.
रेशीम मार्केटमध्ये शेतकऱ्यांची चांदी! वर्षभरात झाली तब्बल 38 कोटींची उलाढाल, Video
शेतकऱ्यांना मिळेल मार्गदर्शन
संगीता यांच्या कार्याचा केवळ विदर्भातील शेतकरीच नाही तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांना जैविक शेतीतल प्रयोग व प्रयोगशाळेचा लाभ होत आहे. जैविक औषधे व खतेही मिळत आहेत. त्याचे मार्गदर्शन मोफत मिळते. तसेच 9422869423 या मोबाईल क्रमांकावर फोन करून ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळवता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Local18, Wardha, Yavatmal, Yavatmal news