जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Navratri : गरब्यात नाचण्यासाठी मुलंही करतायत जय्यत तयारी, पाहा VIDEO

Navratri : गरब्यात नाचण्यासाठी मुलंही करतायत जय्यत तयारी, पाहा VIDEO

Navratri : गरब्यात नाचण्यासाठी मुलंही करतायत जय्यत तयारी, पाहा VIDEO

टिपऱ्या व विविधरंगी पोशाखात गरबा खेळण्यासाठी मुलींबरोबरच मुलांचीही जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील अनेक मंडळांनी दांडियाची तयारीला सुरू केली आहे.

  • -MIN READ Wardha,Wardha,Maharashtra
  • Last Updated :

    वर्धा, 24 सप्टेंबर : सध्या नवरात्रोत्सव तोंडावर आला असून विविध ठिकाणी रास गरब्याची जोरात तयारी सुरू आहे. शारदीय नवरात्रोत्सवात गरब्याची धूम पाहायला मिळणार आहे. टिपऱ्या व विविधरंगी पोशाखात गरबा खेळण्यासाठी मुलींबरोबरच मुलांचीही जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील अनेक मंडळांनी दुर्गामूर्तीसमोर दांडियाच्या आयोजन तयारीला सुरुवात केली आहे.   जिल्ह्यातील लोक वर्षभर नवरात्रीची वाट पाहत असतात. इथल्या नवरात्रोत्सवाची मजा काही औरच असते. नवरात्री म्हणजेच रास गरब्याशिवाय मजा येत नाही. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हे पाहता महिलांनीही रास गरब्याची तयारी सुरू केली आहे.  यासाठी दुर्गा उत्सव मंडळ, काही सामाजिक संस्थेसोबत डान्स क्लासेसच्या माध्यमातून रास गरबा प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात आले आहे. Video : नवरात्रोत्सवाची लगबग सुरू, देवीच्या मूर्ती 25 टक्क्यांनी महाग    घागरा-चोळीला मोठी मागणी नवरात्रोत्सवाच्या आगमनाने बाजारपेठ फुलून गेली आहे. बाजारात रंगबिरंगी पारंपरिक घागरा चोळी अगदी विविध पॅटर्नमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. फॅशन आणि बदलत्या ट्रेडनुसार सामानाची मागणी होत आहे. बदलत्या काळानुसार पारंपरिक गरबा-दांडियामध्येही आधुनिकता डोकावत आहे. बाजारपेठेतही दांडिया नृत्यासाठी घागरा, चुनरी, आणि विविध दागिने दाखल झाले आहेत. मुलींच्या ड्रेसमध्ये घागरा-चोळीला यावेळी मोठी मागणी आहे.   Navratri 2022: नवरात्रीत दिशेशी संबंधित या चुका करू नका, पूजा करताना हे नियम पाळा मंडप उभारणी कामाला वेग  शहरात यंदा दुर्गा उत्सवाची चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे. मंडप उभारणीच्या कामाला वेग आला आहे.आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने कारागिरांनी रात्रंदिवस मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर मूर्तीकारही कुटुंबासह आईची मूर्ती साकारण्यासाठी रात्रंदिवस काम करताना दिसत आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रास गरब्यात तरुणतरुणी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. यात महिला व मुलीही मोठ्या संख्येने सहभागी होतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात