वर्धा, 21 नोव्हेंबर : वर्धा शहरात सुशोभीकरणाअंतर्गत विविध कामे करण्यात आली आहेत. मात्र, पोस्ट ऑफिस चौकातून जेल रोडकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. या रस्त्यावरील दुभाजकामध्ये काटेरी झुडपांसह गवत वाढले आहे. तर दुसरीकडे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. या समस्येमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. वर्धा शहराच्या विकासासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारची कामे करण्यात आली आहेत. ज्यामध्ये जुने रस्ते उखडून नवीन रस्त्यांचे सुशोभीकरण व बांधकामाअंतर्गत विविध कामे करण्यात आली आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस चौक ते जेल रोडकडे जाणाऱ्या रस्त्याचाही समावेश आहे. मात्र, या मार्गावर रस्त्याच्या मधोमध टाकलेल्या डिव्हायडरवर काटेरी झुडपे वाढली आहेत. यामुळे परिसरातून येणेजाणे करणाऱ्यांना त्रास होत आहे. शहरातील मुख्य रस्त्याकडे प्रशासनाकडून विशेष लक्ष देऊन विविध कामे केली जात आहेत. मात्र या मार्गाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. राज्य परिवहन बस आणि खाजगी बस नागपूरच्या दिशेने जातात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवासातही अडचणी निर्माण होतात. शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी! तुटलेले डिव्हायडर पोस्ट ऑफिस ते जेल रोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यात आला आहे. परंतु, मार्गावर दुभाजकाचे काम झाल्यानंतर ते काढण्यात आले नाही. त्यामुळे दुभाजक रस्त्याच्या मधोमध कचऱ्यात विखुरले आहे याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे नागरिक सुयोग शेंडे यांनी सांगितले. दुरुस्तीचे काम लवकरच सुरू या रस्त्यावरील दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत हा रस्ता दुरुस्त होईल, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राजेश भगत यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.