मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वर्धा : मैत्री करुन मित्राच्या शेतात लैंगिक शोषण, सहा महिन्यांनी धक्कादायक माहिती समोर

वर्धा : मैत्री करुन मित्राच्या शेतात लैंगिक शोषण, सहा महिन्यांनी धक्कादायक माहिती समोर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पीडित मुलगी ही समुद्रपूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती मागील काही वर्षांपासून वर्ध्यात शिक्षणासाठी भाड्याच्या खोलीत राहते. स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानात तिची ओळख आरोपी ऋतीक वाडेकर याच्याशी झाली होती.

  • Published by:  News18 Desk
वर्धा, 16 जुलै : राज्यात दिवसेंदिवस अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. यात आता वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या शेतात नेत अल्पवयीन मुलीचे बळजबरी शोषण करुन तिच्यासोबत दुष्कर्म केल्याची संतापजनक घटना समोर आली. काय आहे संपूर्ण प्रकरण 17 वर्षीय मुलीला मित्राच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार करत तिला गर्भवती बनविल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ऋतीक उर्फ सुदर्शन गंगाधर वाडेकर (वय 20, रा. साबळे प्लॉट वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. 15 जुलैला वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पीडित मुलगी ही समुद्रपूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती मागील काही वर्षांपासून वर्ध्यात शिक्षणासाठी भाड्याच्या खोलीत राहते. स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानात तिची ओळख आरोपी ऋतीक वाडेकर याच्याशी झाली होती. त्यानंतर दोघांत मैत्री झाली. पीडिता आरोपी ऋतीकसोबत जुलै 2021मध्येही भेटली होती. यानंतर जानेवारी 2022 मध्ये ऋतीकने पीडितेला फोन केला आणि तिला भेटण्यासाठी गेला. दोघेही दुचाकीवर बसून वर्धा ते देवळी रस्त्याने फिरायला गेले. यानंतर पीडितेला मित्राच्या शेतात नेत आरोपी तरुणाने तिचे बळजबरी शोषण केले. हेही वाचा - लग्न ठरलेल्या प्राध्यापकाचं टोकाचं पाऊल! भावी वधुला मोठा धक्का; नागपुरातील घटना सहा महिन्यांनी धक्कादायक माहिती समोर - जानेवारी नंतर फेब्रुवारी महिन्यातही असाच प्रकार घडला होता. महाविद्यालयाला सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे पीडित मुलगी तिच्या मुळ गावी गेली होती. यावेळी तिची प्रकृती बिघडली. यामुळे पीडितेने सिंदी रेल्वे येथील रुग्णालयात जात तपासणी केली असता पीडिता ही सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यानंतर 14 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पीडितेला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पीडितेवर सध्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
First published:

पुढील बातम्या