मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लग्न ठरलेल्या प्राध्यापकाचं टोकाचं पाऊल! भावी वधुला मोठा धक्का; नागपुरातील घटना

लग्न ठरलेल्या प्राध्यापकाचं टोकाचं पाऊल! भावी वधुला मोठा धक्का; नागपुरातील घटना

प्रा. डॉ. विनोद बागवाले यांनी नागपूर-अमरावती महामार्गालगत कार उभी केली. आणि यानंतर त्यांनी वर्धा नदीपात्रात उडी घेत आत्मत्या केली.

प्रा. डॉ. विनोद बागवाले यांनी नागपूर-अमरावती महामार्गालगत कार उभी केली. आणि यानंतर त्यांनी वर्धा नदीपात्रात उडी घेत आत्मत्या केली.

प्रा. डॉ. विनोद बागवाले यांनी नागपूर-अमरावती महामार्गालगत कार उभी केली. आणि यानंतर त्यांनी वर्धा नदीपात्रात उडी घेत आत्मत्या केली.

  • Published by:  News18 Desk
नागपूर, 16 जुलै : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना समोर येत आहे. काल एका अभिनेत्रीच्या चुलतभावाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली होती. तोच आज नागपुर जिल्ह्यातून एका प्राध्यापकाशी संबंधित बातमी समोर आली आहे. नागपुर जिल्ह्यातील एका प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना घडलील. प्रा. डॉ. विनोद बागवाले, त्यांचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - प्रा. डॉ. विनोद बागवाले यांनी नागपूर-अमरावती महामार्गालगत कार उभी केली. आणि यानंतर त्यांनी वर्धा नदीपात्रात उडी घेत आत्मत्या केली. यानंतर तब्बल 20 तासांनी घटनास्थळापासून तब्बल 13 किलोमीटर अंतरावर निंबोली (शेंडे) येथे त्यांचा मृतदेह आढळला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास ते एमएच-40/एआर-3052 क्रमांकाच्या कारने नागपूर-अमरावती महामार्गावरील खडका या गावाजवळ आले. यानंतर त्यांनी महामार्गाच्या बाजूला कार उभी केली आणि लगतच्या वर्धा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. प्रा. डॉ. विनोद बागवाले (५२, रा. यवतमाळ, ह.मु. काटोल, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे. ते काटोल येथील नबीरा महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेत याची माहिती तळेगाव (श्याम.पंत) पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी लागलीच विविध पथके तयार करून त्यांचा नदीपात्रात शोध घेतला. अखेर शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळापासून 13 किलोमीटर अंतरावरील निंबोली (शेंडे) येथे त्यांचा मृतदेह आढळून आला. हेही वाचा - अवघ्या काही सेकंदात हनुमानाचे पुरातन मंदिर कोसळले, नागपूरचा LIVE VIDEO लग्नापूर्वीच आत्महत्येचे पाऊल... डॉ. विनोद बागवाले यांचा अमरावती येथील मुलीशी विवाह ठरला होता. अवघ्या काही दिवसांवर आला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अजून समोर आलेले नाही. मात्र, विवाहापूर्वी आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये करीत आहे.
First published:

Tags: Nagpur News, Suicide

पुढील बातम्या