मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विषारी सापासोबत खेळ करणं जीवावर बेतलं; वर्ध्यातील युवकाचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

विषारी सापासोबत खेळ करणं जीवावर बेतलं; वर्ध्यातील युवकाचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

या व्यक्तीने सापाला खिशात टाकून फिरण्याचाही प्रयत्न केला. बराच वेळ तो या सापाला आपल्या हातावर खेळवत होता. इतकंच नाही तर त्याने सापाला आपल्या गळ्यात आणि खिशातही ठेवलं (Snake Video)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India
  • Published by:  Kiran Pharate

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा 01 ऑक्टोबर : वर्ध्यात सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मण्यार जातीच्या सापाला पकडल्यावर त्याच्याशी खेळ करणं सर्पमित्राच्या जीवावर बेतलं आहे. वर्ध्याच्या सानेवाडी येथील प्रशांत काशीनाथ काकडे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती विषारी मण्यारसोबत खेळताना दिसतो.

अवघ्या 11 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, 2 महिला जखमी, चंद्रपुरातील VIDEO

वर्ध्याच्या सानेवाडी येथे राहणारा 35 वर्षीय प्रशांत हा गेल्या 15 वर्षांपासून साप पकडतो. नेहमीप्रमाणे विक्रमशिला नगर येथे निघालेल्या सापाला त्याने पकडलं. रेस्क्यू केल्यावर त्याला सोडण्यासाठी जात असताना तो साप बॉटलमधून बाहेर पडला. त्यामुळे प्रशांतने त्याला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला आणि पकडल्यावर त्याच्याशी खेळ केला.  काही नागरिकांनी मोबाईल फोनमध्ये त्याचा व्हिडीओ बनवला. मण्यार सापाशी खेळतानाचा त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्यक्तीने सापाला खिशात टाकून फिरण्याचाही प्रयत्न केला. बराच वेळ तो या सापाला आपल्या हातावर खेळवत होता. इतकंच नाही तर त्याने सापाला आपल्या गळ्यात आणि खिशातही ठेवलं. सापाशी खेळत असताना डाव्या हाताच्या बोटाला मण्यारने दंश केला. मात्र, या दंशाविषयी सर्पमित्राला कळालंही नाही.

भरधाव वेगाने बाईक घेऊन आलेल्या चोरांना, गार्डने घडवली अद्दल; पाहा धक्कादायक Video

अचानक रात्री प्रशांतची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. शेजाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेल्यावर मात्र लगेचच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सापासोबत खेळणं प्रशांतच्या जीवावर बेतलं आहे. मागील वर्षीही दोन युवकांनी सापाशी असाच खेळ केला होता. तेव्हा त्यांनाही आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Snake video