मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'या' योजनेतून घ्या 50 लाखांपर्यंत कर्ज; सरकार फेडेल तुमचं व्याज, VIDEO

'या' योजनेतून घ्या 50 लाखांपर्यंत कर्ज; सरकार फेडेल तुमचं व्याज, VIDEO

स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर बनविण्याकरिता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 15 लाख करण्यात आली आहे.

वर्धा, 16 ऑगस्ट : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवक-युवतींना उद्योगासाठी प्रोत्साहित करण्याकरिता विविध योजना राबवित आहे. स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर बनविण्याकरिता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 15 लाख करण्यात आली आहे. महामंडळाच्या योजनांतर्गत खेळत्या भांडवलांतर्गत (कॅश क्रेडिट व ओव्हर ड्राफ्ट) घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळामार्फत पुनश्च सुरू करण्यात आला आहे. (Annasaheb Patil Aarthik Vikas Mahamandal Yojana)  काय आहे योजनेचा उद्देश?  महामंडळाकडून गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना राबविली जात असून, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेष करून बेरोजगार युवकांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे. योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे, हा या योजनांचा उद्देश आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) : या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यवसायाकरिता, कोणत्याही बँकेमार्फत व्यवसायाकरिता घेतलेल्या कर्जावरील 15 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा जास्तीत-जास्त 5 वर्षाकरिता 12 टक्क्यांच्या मर्यादेत अथवा 4.50 लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा करण्यात येईल. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली मेक्सिकोतील फळबाग; आधुनिक शेतीतून महिलेची लाखोंची कमाई गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) : या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी कमाल रु. २५ लाखाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी 35 लाखाच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी 45 लाखाच्या मर्यादेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाखापर्यंतच्या उद्योग कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) : सदर योजनेअंतर्गत, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या पात्र शेतकरी असणाऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या शेतकरी उत्पादक (किमान 10 सभासद असणाऱ्या) गटांना (Farmers Producers Organization- FPO, कंपनी कायदा, 2013 अन्वये स्थापन झालेले) 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज रक्कम शेतीपूरक उद्योगाकरिता देण्यात येईल. या योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी 7 वर्षाचा आहे. कुणाला मिळेल लाभ  समाजातील युवक, युवतींना दिला जाईल. यासाठी ज्यांच्या दाखल्यावर मराठा असा उल्लेख असे आवश्यक आहे. लाभार्थी हा घेण्याकरिता महाराष्ट्राचा असणे अनिवार्य आहे. पुरुषाकरिता वयोमर्यादा 50 पर्यंत तर महिलांकरिता 55 पर्यंत असेल. वार्षिक उत्पन्न मर्यादित असावे तसेच उमेदवाराने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ आवश्यकता घेतलेला नसावा. अक्षम मापदंडांच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. हेही वाचा- शाळेत मन रमेना म्हणून सुरू केला व्यवसाय; 17 व्या वर्षीच लाखोंची कमाई या संकेतस्थळावर करा अर्ज  www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर योजनानिहाय ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.अधिक माहितीसाठी या पात्ता आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, मुंबई द्वारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा.प्रशासकीय इमारत,तिसरा मजला, सिव्हिल लाईन वर्धा- 442001, दूरध्वनी क्रमांक 07152-242756 या कागदपत्रांची आवश्यकता रेशन कार्ड, बँक पासबुक, विद्युत बिल, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जातीचा दाखला, पॅन कार्ड, एकपानी प्रकल्प अहवाल ही कागदपत्रे लागेल. वर्धा जिल्ह्यातील युवक आज मोठा उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नियमित कर्जाच्या हप्त्याची परतफेड करणाऱ्यांना महामंडळाकडून नियमित व्याज परतावा मिळत आहे. मराठा समाजातील युवक-युवतींनी व्यावसायिक होण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे वर्धा जिल्हा समन्वयक  सागर आंबेकर यांनी केले आहे.
First published:

Tags: Wardha, Wardha news

पुढील बातम्या