वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 25 फेब्रुवारी: जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये परसबाग तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत: केंद्रस्तर, तालुकास्तर आणि नंतर जिल्हास्तरावर हा उपक्रम झाला. वर्धा जिल्हास्तरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आष्टा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लिंगापूरला द्वितीय आणि पांजरा (गोंडी) येथील शाळेला तृतीय क्रमांक मिळाला.
जिल्हा परिषद शाळांत परसबाग स्पर्धा
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये परसबाग तयार करणे या उपक्रमांतर्गत प्रथमतः ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत केंद्रस्तरावर परसबाग विकसित करणे हा उपक्रम राबविण्यात आला. त्यातील निवडक शाळा तालुकास्तरावर पाठविण्यात आल्या. तालुकास्तरावर जानेवारी २०२३ मध्ये परीक्षण समितीमार्फत परीक्षण करून प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला. यामध्ये अनुक्रमे ५ हजार, तीन हजार व दोन हजार रुपयांची पुरस्कार राशी पंचायत समितीमार्फत मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करण्यात आली.
जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तीन शाळा
यानंतर तालुकास्तरावरील पहिल्या क्रमांकांच्या शाळांचे परीक्षण करून जिल्हास्तरीय तीन क्रमांक निवडण्यात आले. यामध्ये पहिला क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टा, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लिंगापूर आणि तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांजरा (गोंडी) यांनी पटकाविला. या शाळांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजार असे पारितोषिक देण्यात आले असून, ही रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यात आली. तसेच या तिन्ही शाळांची राज्यस्तराकरिता निवड झाली असून आता या ठिकाणच्या निवडीकडे लक्ष लागले आहे.
Wardha News: वर्ध्याच्या तरूणाची भरारी, युवा संगममध्ये करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधत्व, Video
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून या शाळांनी मारली बाजी
वर्धा तालुक्यातून प्रथम क्रमांक जि.प. शाळा आष्टा तर दुसर क्रमांक हा जि.प.शाळा आमला तर तिसरा क्रमांक हा जि.प.शाळा उमरी (मेघे) मिळवला आहे. आष्टी तालुक्यातील प्रथम क्रमांक जि.प. शाळा लिंगापूर, द्वितीय क्रमांक जि.प.शाळा तारासावंगा तर तृतीय क्रमांक जि.प. शाळा लहान आर्वीला मिळाला आहे. देवळी तालुक्यातून प्रथम क्रमांक जि.प.शाळा अडेगाव, द्वितीय क्रमांक जि.प.शाळा गौळ तर तृतीय क्रमांक जि.प.शाळा चिखलीचा आला आहे. कारंजा तालुक्यातून प्रथम क्रमांक जि.प.शाळा पांजरा गोंडी, द्वितीय क्रमांक जि.प.शाळा मासोद आणि तृतीय क्रमांक जि.प.शाळा नागझरीचा आला आहे.
आर्वी तालुक्यातील प्रथम क्रमांक हा जि.प.शाळा शिरपूर, द्वितीय क्रमांक जि.प.शाळा रसुलाबाद व तृतीय क्रमांक जि.प.शाळा वडगाव (पां.) आला आहे. समुद्रपूर तालुक्यातील प्रथम क्रमांक जि.प.शाळा लाहोरी, द्वितीय क्रमांक जि.प.शाळा तास व तृतीय जि.प.शाळा वाघेडा आला आहे. सेलू तालुक्यातील प्रथम क्रमांक जि.प.शाळा वाहितपूर, द्वितीय क्रमांक जि.प.शाळा बोथली व तृतीय क्रमांक जि.प.शाळा कोपरा आला आहे. हिंगणघाट तालुक्यातील प्रथम क्रमांक जि.प. शाळा पवनी, द्वितीय क्रमांक जि.प. शाळा काचणगाव आणि तृतीय क्रमांक जि.प.शाळा कुंभीचा आला आहेत.
Latur Pattern: लातूर पॅटर्नचे सूत्र लक्षात ठेवा, दहावीला गणितात 100 मार्क्स मिळवा, Video
परसबागेत काय?
सदर परसबागेत भेंडी, कांदा, फुलकोबी, मेथी, मुळा, गवार, बरबटी, गाजर, टमाटर, वांगी, लसुण अशी पंधरा प्रकारच्या विविध भाज्या पाहायला मिळतात. कमी पाण्याचा वापर करुन कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल. याचे नियोजन परीसरातील शेतक-यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे परसबाग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यापासून भाजीपाला लागवडीचे तंत्र अवलंबिल्याचे सांगितले जात आहे.
शाळांना पारितोषिकही दिले
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा घेण्यात आली. प्रथमतः ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत परसबाग विकसित करणे हा उपक्रम घेतला. त्यानंतर तालुका आणि जिल्हास्तरावर निवड करून शाळांना पारितोषिकही दिले. आता जिल्हास्तरावर निवड झालेल्या शाळा राज्यस्तराकरिता पात्र ठरल्या आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवणे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Local18, School student, Wardha, Wardha news