वर्धा, 18 जानेवारी : थंडीचा जोर वाढल्याने लहान मुलांमधील आजारांचा धोकाही वाढला आहे. हवामानाच्या बदलाचा परिणाम मुलांवर होत आहे. वर्धा जिल्हा रुग्णालयात थंडीमुळे आजारी पडणाऱ्या बालकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यात डायरिया, न्युमोनियाने त्रस्त मुलांची संख्या अधिक आहे. बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक विपरीत परिणाम बच्चेकंपनीवर होतो. त्यामुळेच बदलत्या वातावरणात नागरिकांनी आपल्या कुटुंबातील छोट्या मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मागील बारा महिन्यांच्या काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात 19 हजार 726 बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण निमोनिया आणि डायरियाचे होते. काळजी घेणे आवश्यक विविध आजारांच्या तब्बल साडेतीन हजारांहून अधिक बालकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करावे लागले आहेत. यात निम्म्याहून अधिक रुग्ण निमोनिया तसेच डायरियाचे होते. नागरिकांनी त्यांच्या कुटुंबातील छोट्या मुलांना रस्त्याच्या कडेवर विक्री होणारे खाद्यपदार्थ देण्याचे टाळले पाहिजे. वाढला त्वचारोगाचा धोका, ‘ही’ लक्षणं आढळल्यास लगेच करा तपासणी, Video 19 हजार मुलांवर उपचार लहान मुलांसह मुलांच्या मातेने वारंवार हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तर बदलत्या वातावरणात लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या बारा महिन्यांच्या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवेत तब्बल 19 हजार 726 मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी येथील कार्यरत अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करतात, अशी माहिती डॉ. अमोल येळणे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.