मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अमरावती पदवीधरमध्ये वंचित कोणाचा गेम करणार महाविकास आघाडी की भाजप?

अमरावती पदवीधरमध्ये वंचित कोणाचा गेम करणार महाविकास आघाडी की भाजप?

अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमध्ये आज मतमोजणी प्रक्रीया होणार आहे.

अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमध्ये आज मतमोजणी प्रक्रीया होणार आहे.

अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमध्ये आज मतमोजणी प्रक्रीया होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 02 फेब्रुवारी : अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमध्ये आज मतमोजणी प्रक्रीया होणार आहे. राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप थेट लढत पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी तिरंगी लढत दिसत आहे. दरम्यान अमरावती विभागातील पदवीधर निवडणूकीची मतमोजणी आज (दि.02) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. अमरावती येथील नेमाणी गोडाऊन येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

अमरावतीमध्ये तिरंगी लढत पहायला मिळाली. भाजपकडून रणजीत पाटील तर महाविकास आघाडीकडून धीरज लिंगाडे याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून अनिल अमलाकर यांची उमेदवारी आहे. अत्यंत चुरशीने अमरावती मतदार संघात 102403 मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये 28 टेबलवर मतमोजणी पूर्ण होणार आहे. विभागीय आयुक्तांसह अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम ,यवतमाळ या पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत.

हे ही वाचा : Union Budget 2023 : बच्चू कडूंना आवडली नाही अर्थमंत्र्यांची 'भाषा', पंतप्रधानांना पत्र लिहिणार!

अमरावती शिक्षक मतदार संघातून एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे डॉ. रणजीत पाटील महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे व वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकार यांच्यात चुरस सुरू आहे.

आमदार बच्चू कडू यांची माघार

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने जाहीर केलेल्या किरण चौधरी यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसकडून धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकार, बहुजन भारत पार्टीचे डॉ. गौरव गवई हे राजकीय पक्षाचे चार उमेदवार असून उर्वरित १९ अपक्ष उमेदवार आहेत.

पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघात ३० विधानसभा मतदार संघ तर ५६ तालुके असून प्रचारासाठी उमेदवारांना फक्त १२ दिवस मिळणार असल्याने अक्षरश: पायाला भिंगरी लावून पदवीधरांपर्यंत पोहोचण्याची कसरत करावी लागणार आहे.

हे ही वाचा : हसन मुश्रीफ पुन्हा अडचणीत! ईडीचे अधिकारी 6 तासांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत

तृतीय पंथीयांनाही मतदानाचा अधिकार

पदवीधर मतदारसंघासाठी अमरावती व अकोला जिल्ह्यात 74 तृतीयपंथी पदवीधर मतदारांनी नोंदणी केलेली आहे. उर्वरित यवतमाळ, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात तृतीयपंथी पदवीधरांची नोंदणी निरंक आहे. निवडणूक विभागाने या वेळेस किमान 2.40 लाखांच्या दरम्यान मतदारसंख्या गृहित धरली होती. प्रत्यक्षात 210511 मतदार नोंदणी झाली. ही सन 2017 च्या तुलनेत 24586 मतदारांनी कमी आहे.

First published:

Tags: Amravati