जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Union Budget 2023 : बच्चू कडूंना आवडली नाही अर्थमंत्र्यांची 'भाषा', पंतप्रधानांना पत्र लिहिणार!

Union Budget 2023 : बच्चू कडूंना आवडली नाही अर्थमंत्र्यांची 'भाषा', पंतप्रधानांना पत्र लिहिणार!

Union Budget 2023 : बच्चू कडूंना आवडली नाही अर्थमंत्र्यांची 'भाषा', पंतप्रधानांना पत्र लिहिणार!

Union Budget 2023 Updates In Marathi केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधला हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता, त्यामुळे या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. इनकम टॅक्ससाठीची मर्यादा 5 लाखांवरून 7 लाखांवर नेण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. इंग्रजीमधून बजेट सादर झाल्यामुळे बच्चू कडू नाराज झाले आहेत. राष्ट्रभाषेचा अवमान झाल्याचंही कडू म्हणाले. हिंदी राष्ट्रभाषा असल्याने देशाचं बजेट हिंदीमधून सादर व्हायला पाहिजे होतं. भाजप ही संस्कृती जोपासणारी पार्टी असल्याने पुढच्या अर्थसंकल्पीय बजेट हिंदीतून सादर व्हावं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीणार असल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं. तुम्हाला हिंदी बोलता येत नसेल, तर दुसऱ्याकडून ते बजेट मांडा. नाहीतर माफी मागून इंग्रजी बोला, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. या अर्थसंकल्पावर आपण समाधानी आहोत, पण सरकारने गरिबीची व्याख्या निश्चित केली नाही. घरकूलमध्ये शहर-ग्रामीण तफावत आहे, त्यामध्ये सुधारणा केलेली नाही. शेतकरी, मजूर यांचा भाग सुटलेला आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात