मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha Sahitya Sammelan : साहित्य संमेलनात वर्धा जिल्ह्यातील 235 पुस्तकांचं प्रकाशन! पाहा Video

Wardha Sahitya Sammelan : साहित्य संमेलनात वर्धा जिल्ह्यातील 235 पुस्तकांचं प्रकाशन! पाहा Video

X
Wardha

Wardha Sahitya Sammelan

वर्धा जिल्ह्यातील लेखक व साहित्यिकांनाही न्याय मिळावा म्हणून एक विशेष दालन राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

    वर्धा, 04 फेब्रुवारी : वर्धा  येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. ग्रंथ दालनात प्रदर्शन आणि विक्रीची तब्बल ३०० दालने आहेत. वर्धा जिल्ह्यातील लेखक व साहित्यिकांनाही न्याय मिळावा म्हणून एक विशेष दालन राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत आहे. याच दालनात वर्धा जिल्ह्यातील विविध भागांतील ८४ लेखकांचे २३५ पुस्तके प्रकाशित झाली आहे. 

    जिल्हा ग्रंथालयात झाले ग्रंथ संकलन

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ दालनात वर्धा जिल्ह्यातील साहित्यिक व लेखकांना आपली पुस्तके ठेवता यावी या हेतूने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात पुस्तके व ग्रंथ मागविण्यात आले होते. २८ जानेवारीपर्यंत जिल्हा ग्रंथालयाला वर्धा जिल्ह्यातील ८४ लेखकांचे तब्बल २३५ पुस्तके प्राप्त झालीत. हीच ग्रंथसंपदा राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीतील विशेष ग्रंथ दालनात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाचकांसाठी मोठे खाद्य उपलब्ध झाले आहे.

    दालनात काय विशेष?

    कोविड संकट काळाचे वास्तव मांडणारे मी पॉझिटिव्ह आलो हे पुस्तक सहकार महर्षी बापूराव देशमुख यांच्या कार्याची माहिती देणारे, डॉ. मालिनी वरच ढकर यांचा ग्रंथ, दलित व सांविधानिक साहित्य या विषयावरील डॉ. सुभाष खंडारे यांचा ग्रंथ. आचार्य सूर्यकांत भगत यांनी लिहिलेले दलित साहित्य या सोबत विविध व्यक्तिरेखेच्या वलयात चंद्रशेखर दंढारे याचे ही पुस्तक यात प्रदर्शन ठेवले आहेत. 

    'कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंचा संघर्ष संपेना! पाहा Video

    जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना

    वर्धेत होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ दालनात वर्धा जिल्ह्यातील साहित्यिक व लेखकांची ग्रंथ राहावी, अशी संकल्पना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मांडली. शिवाय संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात वर्धा जिल्ह्यातील लेखक व साहित्यिकांनी त्यांची ग्रंथ ठेवण्यासाठी ती जिल्हा ग्रंथालय कार्यालयात आणून द्यावी, असे आवाहन केले होते. 

    First published:

    Tags: Local18, Wardha