मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंचा संघर्ष संपेना! घरासाठी परवड सुरूच, Video

'कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंचा संघर्ष संपेना! घरासाठी परवड सुरूच, Video

X
घरापासून

घरापासून वंचित राहिलेल्या ‘कोल्हाट्याचं पोर’कार डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या मातोश्री शांताबाई काळे यांचा संघर्ष संपेना.

घरापासून वंचित राहिलेल्या ‘कोल्हाट्याचं पोर’कार डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या मातोश्री शांताबाई काळे यांचा संघर्ष संपेना.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Solapur [Sholapur], India

  अनुराग सुतकर, प्रतिनिधी

  सोलापूर 3 फेब्रुवारी : घरापासून वंचित राहिलेल्या ‘कोल्हाट्याचं पोर’कार डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या मातोश्री शांताबाई काळे यांचा संघर्ष संपेना. घरासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते मंत्री व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत अर्ज - विनंती केल्या. तरीही घर मिळेना. तसेच वेळेवर कलावंताचे मानधनही मिळेना, अशा विचित्र कोंडीत शांताबाई सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत सांगा कसं जगायचं ? यामुळे कुणी घर देता का घर, असा आर्त टाहो ज्येष्ठ कलावंत शांताबाई काळे यांनी फोडला आहे.

  मानधन वेळेवर नाही

  कोल्हाट्याचं पोर या आत्मचरित्राचे लेखक डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा 19 फेब्रुवारी 2007 रोजी वयाच्या 37 व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुखाचे दिवस बघण्याची आशा असतानाच त्यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. 40 वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या आणि मुलाला मोठे केलेल्या डॉ. किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे या आज अत्यंत दयनीय अवस्थेत आयुष्य जगत आहेत.

  निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे 1500 रुपये मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. तेही कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. तीन-तीन महिने विलंब होतो. अशा विदारक परिस्थितीतून त्यांना रोजचे जीवन जगावे लागत आहे.

  प्रेग्नेंट महिलांच्या मदतीला धावणारा रिक्षावाला भाऊ, शिवरायांच्या सच्च्या मावळ्याचं होतंय कौतुक, Video

  काय आहे अडचण?

  सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी साडेचार वर्षांपूर्वी शांताबाई काळे यांना घर देण्याचे कृतीशील आश्वासन दिले. तेवढ्यावरच न थांबता डॉ. भारुड यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितले. त्यावेळी करमाळा तालुक्यातील नेरले येथे त्यांना घरासाठी जागाही उपलब्ध केली. त्या जागेच्या उताऱ्यावर शांताबाई काळे यांचे नावही लागले. बांधकाम सुरू झाले होते. दरम्यान, सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली झाली. त्यानंतर मात्र अचानकपणे विविध अडचणीमुळे हे बांधकाम खोळंबले आहे. प्रशासकीय स्तरावरही संबंधित अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष झाले.

  त्यानंतर पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांना भेटून अर्ज विनंती केली. राहायला घर मिळावे यासाठी मागणी केली. त्याचबरोबर मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनाही लेखी निवेदन दिले. काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे जाऊन हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी राहायला हक्काचे घर आणि वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी पाठपुरावा केला. आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. त्यांनीही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनाही निवेदन दिले. आश्वासनापलीकडे ठोस अशी कार्यवाही झालेली नाही.

  Solapur State Bank : मृत पत्नीचं खातं बंद करायला गेला अन् खात्यावरील रक्कम बघून पतीला बसला धक्का

  तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनाही पत्र लिहिले होते. राज्यपाल कार्यालयाकडून सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांना शांताबाई काळे यांचे राहायला घर आणि उदरनिर्वाहाची तजवीज या मागणीविषयीचे पत्र उचित कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात आले होते. मात्र, मराठी भाषा विभाग यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करू शकत नाही, अशी व्यथा शांताबाई काळे यांनी यावेळी व्यक्त केली.

  First published:

  Tags: Local18, Solapur