वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 11 मार्च: बाजारात किंवा दुकानात धान्य, भाजीपाला यांच्या मापात अफरातफर होण्याचे प्रकार घडत असतात. वर्धा जिल्ह्यात मापात पाप करणाऱ्यांविरोधात वैधमापन विभागाने कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 140 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 4 लाख 34 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. एखाद्याने सहा महिन्यांच्या आत दंड भरला नाही. तर प्रकरण कोर्टात दाखल केले जाते.
भाजीबाजाराकडेही असते लक्ष
भाजीबाजारात वजनकाट्यात अफरातफरीचे प्रकार अधिक होतात. काही विक्रेते तराजू, इलेक्ट्रॉनिक काट्यातही गडबड करतात. त्यामुळे आठवडी बाजार किंवा भाजी बाजाराकडे वैधमापनशास्त्र विभागाची विशेष लक्ष आहे. भाजी बाजारातील वजन काट्यांची अचानक तपासणी केली जाते.
तक्रारदारांचे नाव गुप्त ठेवले जाते
वजनकाट्यातील गडबडीबाबत तक्रार केल्यास वैधमापनशास्त्र विभागाकडून तात्काळ कारवाई केली जाते. त्यामुळे तक्रारीला फार महत्त्व आहे. मात्र तक्रार प्राप्त झाल्यावर तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते. त्यामुळे नागरिकांनी वजनकाट्यात अफरातफरीचे प्रकार आढळल्यास तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन वैधमापन विभागाकडून करण्यात आले आहे.
Wardha News: जैविक शेतीसाठी उभारली प्रयोगशाळा, 'या' महिलेची कामगिरी शेतकऱ्यांसाठी वरदान, Video
तर तक्रार कोठे कराल?
वर्धा येथे वैधमापनशास्त्र विभागाचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयात जाऊन नागरिकांना लेखी तक्रार करता येते. तसेच 9404951828 या क्रमांकावर तक्रार नोंदविता येते.
वैधमापन विभागाकडे कर्मचाऱ्यांचा अभाव
वैधमापनशास्त्र विभागाकडे कर्मचाऱ्यांची वानवा आहे. वर्धा जिल्ह्यात तीन पदे रिक्त आहेत. हिंगणघाट व आर्वी विभागाचे निरीक्षक पद रिक्त आहे. यामुळे एकाच निरीक्षकावर तीन विभागांचा भार येत असल्याने त्यांनाही काही अडचणींचा सामना करावा लागतो.
डाळिंबाचं बिस्किट कधी पाहिलंय? नव्या संशोधनाचा होणार शेतकऱ्यांना फायदा, Video
शेर, पायली, रिंगा शासनाने ठरविली अवैध
शेर, पायली, रिंगा ही मापे शासनाने अवैध ठरविली आहेत. त्यामुळे या मापांचा वापर व्यावसायिकांनी करू नये. तसेच दरवर्षी इलेक्ट्रॉनिक आणि इतर वजनांची अधिकृत एजन्सीकडून तपासणी करून घ्यावी. मोहिमेदरम्यान काही दोष आढळला तर दोषींवर कठोरच कारवाई केली जाते, अशी माहिती वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक एन. बी. आष्टके यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Wardha, Wardha news