जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Virar news : पाय धुण्यासाठी जाणे जीवावर बेतलं, भिंत कोसळून 3 महिलांचा मृत्यू

Virar news : पाय धुण्यासाठी जाणे जीवावर बेतलं, भिंत कोसळून 3 महिलांचा मृत्यू

(विरारमधील घटना)

(विरारमधील घटना)

काम संपल्यानंतर साचलेल्या पाण्यातच हात पाय धुताना पायासाठी गेले असताना बांधलेली भिंत या कामगारांच्या अंगावर कोसळली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय देसाई, प्रतिनिधी  विरार, 06 जून : मुंबई जवळील विरारमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे. भिंतीच्या ढिगाराखाली अजूनही 4 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये 3 महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वच्या मनवेलपाडा रोडवर ही घटना घडली आहे. या परिसरात सूर्य किरण या बिल्डिंगचे रीडेव्हलपमेंटचे काम सुरू आहे. आज दुपारी बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून चार कामगार धिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. (पुण्यात कोयता गँगची दहशत, 5 आरोपींना ठोकल्या बेड्या पाहा VIDEO) आज दुपारच्या सुमारास हे कामगार काम संपल्याने घराकडे निघत होते. मात्र काम संपल्यानंतर साचलेल्या पाण्यातच हात पाय धुताना पायासाठी गेले असताना बांधलेली भिंत या कामगारांच्या अंगावर कोसळली. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले होते. इतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर बचावकार्य सुरु झाले आहे. अग्निशमन पथकाच्या जवनांमार्फत त्यांना या कामगारांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराआधीच तीन महिला कामगारांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत जखमी असलेल्या एका मजुरावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालघरमध्ये भीषण अपघातात 3 ठार दरम्यान, डहाणू जव्हार नाशिक मार्गावर आज डहाणू तालुक्याच्या हद्दीत पुन्हा एकदा भीषण असा अपघात झाला. स्कुटी, बाईक आणि रिक्षा असा 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात 2 बाईक स्वारांचा जागीच मृत्यू झाला.  तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. डहाणू तालुक्यातील रानशेत इथं हा भीषण असा अपघात झाला असून जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.  कल्पेश दशरथ गोवारी (वय वर्ष 30), तर दुसरा अज्ञात  यांचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर दिलीप वरठा,  माणिक डगला आणि पिंकी डगला हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. धोकादायक वळणावर ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात झाला असून डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय वसावे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात