जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कोयता गँगची दहशत, 5 आरोपींना ठोकल्या बेड्या पाहा VIDEO

पुण्यात कोयता गँगची दहशत, 5 आरोपींना ठोकल्या बेड्या पाहा VIDEO

कोयता गँग

कोयता गँग

पुण्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोयता गँग दहशत पसरवत असल्याचं दिसत आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे : पुण्यात वारंवार कोयता गँग धुमाकूळ घालत आहे. पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोयता गँग पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याने परिसरात दहशतीचं वातावरण पसरत आहे. पुण्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोयता गँग दहशत पसरवत असल्याचं दिसत आहे.

जाहिरात

येरवड्यातील गांधी नगरमध्ये रविवारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कोयता आणि शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा आरोपी प्रयत्न करत आहेत. पाच आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने पाठलाग करत कोयता व काठीने फिर्यादीला गंभीर जखमी केले.

shivrajyabhishek din 2023 : ‘छत्रपती शिवरायांनी जनतेचं राज्य चालवलं, भोसलेंचं राज्य केलं नाही’

कोयता गँगचे लोण हळूहळू पसरत चालले आहे. नुकतेच शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात टोळक्याने वैमनस्यातून कोयते उगारुन दहशत माजविली.टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केली. या प्रकरणी पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : आता बसायला लागतंय! पुण्यात मिळतेय चक्क ‘बिअर’ आईस्क्रीम, कुठे आहे हा प्रकार? VIDEO

पुणे शहरात ओरसे यांच्या मोटारीची काच फोडली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा, दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune , pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात