जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / chandrapur news : ग्राहकाची उरलेली बिअर प्यायल्यामुळे वेटरचा मृत्यू, बारमधला घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले

chandrapur news : ग्राहकाची उरलेली बिअर प्यायल्यामुळे वेटरचा मृत्यू, बारमधला घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले

(चंद्रपूरमधील घटना)

(चंद्रपूरमधील घटना)

टेबलवर शिल्लक असलेली अर्धी बिअरची बाटली वेटर भगवान गेडाम याच्या नजरेस पडली. बिअरची बाटली भरलेली असल्यामुळे त्याला पिण्याचा मोह आवरला नाही.

  • -MIN READ Chandrapur,Maharashtra
  • Last Updated :

हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 23 जून : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बिअर पिण्याकडे तळीरामांचा पहिला कल असतो. पण एका वेटरला बाटलीत राहिलेली बिअर पिणे जिवावर बेतलं आहे. एका ग्राहकाची उरलेली बिअर पिल्याने वेटरचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा शहरातील सोमनाथपूर मटण मार्केटच्या बाजूला असलेल्या (लक्की) बिअर बारमध्ये हा प्रकार घडला आहे. लक्की बिअर बारमध्ये नेहमी प्रमाणे गर्दी होती. एका 28 वर्षांच्या ग्राहकाने बारमध्ये बसून बिअर रिचवली. पण, जास्त झाल्यामुळे त्याने अर्धी बाटली तशीच ठेऊन बाहेर पडला. थोड्यावेळाने तो आत आला. त्यानंतर आत येताना आणलेले द्रव्य बिअरमध्ये ओतले. ती बिअर प्यायल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो बार बाहेर निघून गेला. (2 लेकरांची आई असलेल्या वहिनीसोबत नराधम दिराने केले सैतानी कृत्य, पोलीसही संतापले) दरम्यान, टेबलवर शिल्लक असलेली अर्धी बिअरची बाटली वेटर भगवान गेडाम याच्या नजरेस पडली. अर्धी बिअरची बाटली भरलेली असल्यामुळे त्याला पिण्याचा मोह आवरला नाही, त्याने शिल्लक असलेली बिअर पिऊन टाकली. बिअर पिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो काही क्षणातच जागेवरच कोसळला. बारमध्ये एकच गोंधळ उडाला. भगवान गेडाम यांची तपासणी केली असता तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. (बाप दररोज दारू पिऊन यायचा; मुलाचा राग अनावर! आता आहे तुरुंगात) घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर त्यांनी तपास हाती घेतला. प्रथमदर्शनी ग्राहक अभय लांडे याने आत्महत्या करण्यासाठी बिअरमध्ये काही तरी द्रव टाकून मरण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकृती बिघडल्याने तो बाहेर पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र इकडे वेटर मात्र मृत पावला अशी हकीकत पुढे आली आहे. पोलिसांनी सर्व बाजुंनी चौकशी सुरू केली आहे. बिअरची बाटली ताब्यात घेण्यात आली असून रासायनिक परीक्षण अहवाल आल्यावर योग्य ते गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात