जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News : 2 लेकरांची आई असलेल्या वहिनीसोबत नराधम दिराने केले सैतानी कृत्य, पोलीसही संतापले

Nagpur News : 2 लेकरांची आई असलेल्या वहिनीसोबत नराधम दिराने केले सैतानी कृत्य, पोलीसही संतापले

Nagpur News : 2 लेकरांची आई असलेल्या वहिनीसोबत नराधम दिराने केले सैतानी कृत्य, पोलीसही संतापले

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असतांना नागपुरातून नात्याला काळीमा फासणारी एक लाजीरवाणी घटना उघडकीस आली आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर 23 जून : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असतांना नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत नात्याला काळीमा फासणारी एक लाजीरवाणी घटना उघडकीस आली आहे. नात्यात असलेला दिर आपल्या वहिनीला वासनेचा शिकार बनवत होता. आरोपीने आधी वहिनीचा अश्लील व्हिडिओ बनवला, त्यानंतर वर्षभर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नागपूर शहरालगतच्या राज्यातून उपजीविकेसाठी कामगार वर्ग नागपूर शहरासारख्या मोठ्या शहरामध्ये दाखल होत असतो. मूळचा मध्यप्रदेश येथील अश्याच कामगार वर्गातील आरोपीने आपल्या वाहिनीवर बलात्कार केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 30 वर्षांची असून ती अजनी परिसरामध्ये राहते. मुळात ही महिला देखील मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. 1 वर्षापूर्वी कामानिमित्त ती पती आणि दोन मुलांसह नागपूरच्या अजनी परिसरामध्ये राहायला आली होती.

News18लोकमत
News18लोकमत

तिचा नवरा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. आरोपी हा नात्यातील असून पीडित महिला ही त्याची वहिनी लागत होती. वर्षभरापूर्वी महिला तिच्या खोलीत कपडे बदलत असताना आरोपीने तिचा मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला होता, हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​आरोपी महिलेवर बलात्कार करत होता. महिलेने या घटनेची तक्रार तिच्या पतीकडे केली तेव्हा घरगुती प्रकरण असल्याने त्याला समज देऊन या विषयावर पडदा टाकण्याचे काम केले. याचा फायदा घेत आरोपी महिलेचा सतत छळ करत राहिला.

बाप दररोज दारू पिऊन यायचा; मुलाचा राग अनावर! आता आहे तुरुंगात

पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारी वरून आरोपीला अटक करण्यात आली असून कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही दोन मुलांची आई असून आरोपीने या अश्लील व्हिडिओचा आधार घेत महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. शिवाय मारहाण करत मुलांना जिवेमारण्याची धमकी दिली आहे. आरोपीचा पिसिआर सुरू असुन या घटनेतील तपास सुरू आहे. आरोपीचा पार्श्वभूमी तपासातून पुढे येईल आणि सदर घटनेचे पुरावे गोळा करण्याचे कार्य सुरू आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अजनी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षण कल्याणी हुमने यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात