Home /News /maharashtra /

Virar: दिवस - रात्र PUBG खेळून बिघडले मानसिक संतुलन, अखेर गमावला जीव

Virar: दिवस - रात्र PUBG खेळून बिघडले मानसिक संतुलन, अखेर गमावला जीव

Pubg game: ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसनच एकप्रकारे तरुणांना लागल्याचं पहायला मिळत आहे. याच व्यसनामुळे अनेक दुर्घटना घडल्याचंही समोर आलं आहे. आता अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.

    विरार, 9 डिसेंबर : पबजी गेमने (PUBG game) तरुणांना अक्षरश: वेड लावल्याचं पहायला मिळत आहे. ऑनलाईन गेम (Online Game) आणि पबजीमुळे एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापूर्वीही अशा विविध घटना समोर आल्या असतानाही या घटनांतून तरुण काही शिकताना दिसत नाहीयेत. विरार (Virar) येथील एका तरुणाला पबजीचं इतकं वेड लागलं होतं की त्यात त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. विरार येथे राहणारा 23 वर्षीय दीपक याला पबजी खेळण्याचं व्यसन लागलं होतं. तो रात्रंदिवस पबजी गेम खेळत होता. सातत्याने खेळत असलेल्या ऑनलाईन गेममुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यातच त्याने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला. झोपेच्या गोळ्यांचा जास्त खाल्ल्यामुळे दीपक याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपक हा सातत्याने ऑनलाईन गेम खेळत होता आणि त्याचाच त्याच्यावर परिणाम झाला होता. मुंबईतील कांदिवली परिसरातील एका रुग्णालयात दीपक याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. टीव्ही9 ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. वाचा : आता लहान मुलांना विळख्यात घेतोय कोरोना मथुरात 2 मित्रांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅकजवळ पडलेल्या मोबाइलमध्ये सुरू होता PubG गेम उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh News) मथुरा जिल्ह्यात शनिवारी एक अत्यंत धक्कादायक अपघात (Shocking Accident) झाला. या अपघातात रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. त्याशिवाय पुढील तपासही सुरू आहे. सांगितलं जात आहे की, दोन्ही तरुण रेल्वे ट्रॅकवर बसून पबजी गेम (PubG Game) खेळत होते. यादरम्यान रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना यमुनापार भागातील एका पेट्रोल पंपाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडली. पोलिसांनी सांगितलं की, कालिंद्री कुंज निवासी 16 वर्षीय गौरव आणि 18 वर्ष्यी संजय सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. दोघेही घरापासून साधारण अर्धा किमी दूर मथूरा कासगंज रेल्वे मार्वार बसून कानात ईअरफोन लावून पब्जी गेम खेळत होते. यादरम्यान त्यांना ट्रॅकवरून येणाऱ्या रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला नाही आणि दोघांना रेल्वेने चिरडलं. यात दोघांचाही मृत्यू झाला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Game, PUBG, Virar

    पुढील बातम्या