मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 मित्रांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅकजवळ पडलेल्या मोबाइलमध्ये सुरू होता PubG गेम

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 मित्रांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅकजवळ पडलेल्या मोबाइलमध्ये सुरू होता PubG गेम

मुलांच्या एका चुकीमुळे त्यांच्या जीवावर बेतलं आहे.

मुलांच्या एका चुकीमुळे त्यांच्या जीवावर बेतलं आहे.

मुलांच्या एका चुकीमुळे त्यांच्या जीवावर बेतलं आहे.

मथुरा, 21 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मथुरा जिल्ह्यात शनिवारी एक अत्यंत धक्कादायक अपघात (Shocking Accident) झाला. या अपघातात रेल्वे ट्रॅकवर (Railway Accident) बसलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. त्याशिवाय पुढील तपासही सुरू आहे. सांगितलं जात आहे की, दोन्ही तरुण रेल्वे ट्रॅकवर बसून पब्जी गेम (PubG Game) खेळत होते.

यादरम्यान रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना यमुनापार भागातील एका पेट्रोल पंपाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडली. पोलिसांनी सांगितलं की, कालिंद्री कुंज निवासी 16 वर्षीय गौरव आणि 18 वर्ष्यी संजय सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. दोघेही घरापासून साधारण अर्धा किमी दूर मथूरा कासगंज रेल्वे मार्वार बसून कानात ईअरफोन लावून पब्जी गेम खेळत होते. यादरम्यान त्यांना ट्रॅकवरून येणाऱ्या रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला नाही आणि दोघांना रेल्वेने चिरडलं. यात दोघांचाही मृत्यू झाला.  (Death of 2 friends who went for morning walk The PubG game started in a mobile lying near the railway track)

हे ही वाचा-दिवस-रात्र मेहनत करून स्वप्नातील बांधलं घर; गृहप्रवेशानंतर पती-पत्नीने सोडला जीव

मोबाइलमधील गेमने घेतला जीव

पोलीस ठाण्याचे प्रभारी शशी प्रकाश शर्मा यांनी सांगितलं की, अपघाताचं कारण मोबाइलवरील पब्जी गेम असल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाच्या हातातील फोन पूर्णपणे तुटला होता. तर दुसऱ्या तरुणाच्या मोबाइल फोनमध्ये गेम सुरू होता. हा मोबाइल तरुणाच्या हातातून लांब पडला असल्याची शक्यता आहे. सध्या दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Accident, Crime, Railway, Railway accident