मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Chandrapur: भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबासोबत अमानुष कृत्य; भरचौकात हातपाय बांधले अन्...

Chandrapur: भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबासोबत अमानुष कृत्य; भरचौकात हातपाय बांधले अन्...

अंधश्रद्धेला बळी पडत गावातील अनेकांनी एकत्र येत दलित कुटुंबासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. (फोटो-लोकमत)

अंधश्रद्धेला बळी पडत गावातील अनेकांनी एकत्र येत दलित कुटुंबासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. (फोटो-लोकमत)

Crime in Chandrapur: पुरोगामी महाराष्ट्राला कंलकित करणारी धक्कादायक घटना चंद्रपूरात घडली आहे. कोणताही पुरावा नसताना केवळ अंधश्रद्धेला बळी पडत गावातील अनेकांनी एकत्र येत दलित कुटुंबासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे.

चंद्रपूर, 23 ऑगस्ट: पुरोगामी महाराष्ट्राला कंलकित करणारी धक्कादायक घटना चंद्रपूरात (Chandrapur) घडली आहे. भानामती (Black Magic) केल्याच्या संशयातून येथील एका दलित कुटुंबाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण (Dalit Family Beaten By Villagers) केली आहे. कोणताही पुरावा नसताना केवळ अंधश्रद्धेला बळी (Crime under Superstition) पडत गावातील अनेकांनी एकत्र येत या कुटुंबासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपींनी दलित कुटुंबातील सात जणांना भरचौकात नेऊन त्यांचे हातपाय बांधून मारहाण (tied up and beat) केली आहे. यामध्ये सातही जण जखमी झाले असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. संबंधित पाच गंभीर जखमींना चंद्रपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

संबंधित घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीपासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या अति दुर्गम भागातील वणी खुर्द गावात घडली आहे. माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी उघडकीस आली आहे. पण घटना घडून चोवीस तास उलटल्यानंतर यावर पोलिसांनी ठोस कारवाई केल्याचं दिसत नाही. याउलट या घटनेत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण किती लोकांवर गुन्हा दाखल केला? किती लोकांना अटक केली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

हेही वाचा-वजन कमी करण्यासाठी दिलं भलतंच इंजेक्शन; जिम ट्रेनरचं तरुणीसोबत घृणास्पद कृत्य

नेमकं प्रकरण काय आहे?

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी संचारली होती. गावातील दलित समाजातील 8 ते 10 वयोवृद्ध पुरुष आणि महिलांनी गावावर भानामती केल्याचं देवी संचारलेल्या महिलांनी सांगितलं. ही बाब समोर येताच गावातील काही जणांनी संबंधित सर्वांना गावातील चौकात आणलं. येथील खांबाना सर्वांचे हातपाय बांधत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत सात जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आलं आहे.

हेही वाचा- विकृतीचा कळस! घोडीवर बलात्कार; आठवड्यातून 4 वेळा कंडोम घालून ठेवायचा लैंगिक संबंध

संबंधित दलित समाजातील काही जणांना मारहाण होताना, भीतीनं गावातील कोणीही मध्ये पडले नाहीत. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात तणावाच वातावरण तयार झालं होतं. याबाबत अधिक माहिती देताना गडचांदूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी सांगितलं की, 'वणी खुर्द या गावात एका कुटुंबावर जादूटोणा करत असल्याबाबत संशय होता. यातून त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी जाऊन त्यांना सोडविले. याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.'

First published:
top videos

    Tags: Beating retreat, Chandrapur, Crime news