Home /News /maharashtra /

VIDEO : अख्खं गाव महिलेच्या मृतदेहामागे धावत होतं, जळगावातील अपघातानंतर घडला भयावह प्रकार

VIDEO : अख्खं गाव महिलेच्या मृतदेहामागे धावत होतं, जळगावातील अपघातानंतर घडला भयावह प्रकार

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे आयशर ट्रक उलटून 15 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने लोकांना धक्काच बसला आहे

    जळगाव, 15 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे आयशर ट्रक उलटून 15 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने लोकांना धक्काच बसला आहे. या अपघातातील मृत 10 जण रावेर तालुक्यातील अभोडा गावातील रहिवासी होते. त्यापैकी एका महिलेचा मृतदेह पळून नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओदेखील समोर आला असून यामध्ये गावकरी मृतदेह नेणाऱ्या गाडीच्या मागे धावत असल्याचं दिसत आहे. हा एका महिलेचा मृतदेह आहे. ही विवाहित महिला आपल्या माहेरीच राहत होती. 3 वर्षांपूर्वी सासरच्या मंडळींनी महिलेला राहू देण्यास नकार दिल्याने ती आपल्या माहेरी राहत होती. अपघातात या विवाहितेचा मृत्यू झाल्याने सदर महिलेचा मृतदेह आभोडा या गावी आणण्यात आला होता. मात्र त्याचवेळी विवाहितेची सासरची मंडळी तेथे  हजर होती. हे ही वाचा-...तर पुन्हा लॉकडाऊन करणार लागू; ठाकरे सरकारकडून अलर्ट या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सासरी करण्याची मागणी करू लागले. यास विरोध करत अभोडा गावातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. विरोध होत असल्याने सासरच्या मंडळींनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह पळवून नेण्याचा प्रयत्न केला. गावातली शेकडो महिलांनी अक्षरशः रुग्णवाहिकेच्या मागे धावत जाऊन रुग्णवाहिका अडवली. सदर घटनेनं गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. एकीकडे संपूर्ण गावात दुःखाचे वातावरण त्यात विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण गावात संताप व्यक्त होत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Jalgaon, Maharashtra, Road accident, Truck accident, Woman dead body

    पुढील बातम्या