जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: मनोरुग्णाचा बसस्थानकामध्ये अर्धनग्नावस्थेत धिंगाणा, महिला प्रवाशांची तारांबळ

VIDEO: मनोरुग्णाचा बसस्थानकामध्ये अर्धनग्नावस्थेत धिंगाणा, महिला प्रवाशांची तारांबळ

VIDEO: मनोरुग्णाचा बसस्थानकामध्ये अर्धनग्नावस्थेत धिंगाणा, महिला प्रवाशांची तारांबळ

Sangli News: सांगली जिल्ह्यातील विटा बसस्थानक (Vita bus stand) परिसरात एका मनोरुग्णानं अर्धनग्नावस्थेत (half naked) धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 17 जुलै: सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटा बसस्थानक (Vita bus stand) परिसरात एका मनोरुग्णानं अर्धनग्नावस्थेत (half naked) धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. संबंधित व्यक्तीनं अंगावरील कपडे काढत बसस्थानक परिसरात सर्वत्र चकरा मारल्या आहेत. यामुळे बसस्थानकावरील महिला प्रवाशांसह अन्य नागरिकांची पुरती धांदल उडाली आहे. मनोरुग्णानं बस स्थानकावर बराच वेळ धिंगाणा घातल्यानंतर सुरक्षा रक्षकानं त्याला परिसरातून हाकलून लावलं आहे. ही सर्व घटना एका प्रवाशानं आपल्या मोबाइलमध्ये चित्रीत केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हेही वाचा- जुन्या वादातून भरदिवसा गोळीबार; हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद, पहा धक्कादायक CCTV टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. दरम्यान एका मनोरुग्ण व्यक्तीनं अर्धनग्नावस्थेत विटा बस स्थानक परिसरात प्रवेश करत सर्वत्र फिरला आहे. यानंतर तो बसस्थानकाला पहारा देणाऱ्या गार्डच्या खुर्चीवर जाऊन आरामात बसला आहे. अचानक घडलेल्या या प्रकरामुळे बसस्थानकावरील महिला प्रवाशांसह अन्य नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. यानंतर उपस्थित प्रवाशांनी या घटनेची माहिती बसस्थानकावरील सुरक्षा रक्षकाला दिली.

जाहिरात

हेही वाचा- VIDEO:फरसाण न दिल्यानं दुखावला आत्मसन्मान;लॉकडाऊनचं कारण देत पोलिसानं घेतला बदला यानंतर सुरक्षा रक्षकानं काठीचा धाक दाखवत संबंधित मनोरुग्णाला बसस्थानक परिसरातून हाकलून लावलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला असून बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे बसस्थानकावर फारशी गर्दी नसल्यानं बस स्थानक परिसरात गैरप्रकार वाढले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात