VIDEO: जुन्या वादातून भरदिवसा गोळीबार; घटनेचं थरारक CCTV फुटेज आलं समोर

Firing in daylight incident caught in Camera: एका तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

Firing in daylight incident caught in Camera: एका तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

  • Share this:
बीड, 17 जुलै : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर दिवसा गोळीबार (Firing in daylight) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील (Beed District) मादळमोही गावात (Madalmohi Village) हा प्रकार घडला आहे. नशीब दैव बलवत्तर आणि वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले आहेत. ही संपूर्ण घटना घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद (Firing incident caught in CCTV) झाली असून तो व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. VIDEO: राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात हातसफाईचा प्रयत्न; मनसैनिकांनी हाणून पाडला पाकिटमाराचा डाव काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ आज सकाळी समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. तसेच बीडमध्ये कायद्याचे भय आहे की नाही हा प्रश्न निर्माण केला जात आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुल्लक कारणावरुन शेजाऱ्यांत फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO पाहून चक्रावून जाल मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर आणि येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. काल सायंकाळच्या सुमारास दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता याठिकाणी दोन तरुण मोटारसायकलवरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्याला एका जणांनी पिस्तूल लावून गोळी झाडली. यावेळी गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार आणि अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Published by:Sunil Desale
First published: