मुंबई, 9 डिसेंबर, गणेश दुडम : आज पुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ सिमेंटचे पोते भरलेल्या मालवाहू ट्रकचा थरार पहायला मिळाला. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल होताच चालकाने ट्रक रसत्याच्या कडेला हॅन्ड ब्रेक लावून उभा केला. मात्र अचानक हा सिमेंटच्या पोत्याने भरलेला ट्रक हॅन्ड ब्रेक निकामी होऊन द्रुतगती मार्गावर धावला. या ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. …तर घडला असता मोठा अनर्थ पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर हा ट्रकचा थरार पहायला मिळाला आहे. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ सिमेंटचे पोते भरलेल्या मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत हा ट्रक हॅन्ड ब्रेकच्या मदतीने रस्त्याच्या कडेला उभा केला. मात्र त्यानंतर या ट्रकचे हॅन्ड ब्रेक देखील फेल झाले. हॅन्ड ब्रेक फेल होताच हा ट्रक महामार्गावर धावू लागला. चालकाने ट्रकमधून उडी मारली व या ट्रकमागे असलेल्या गाड्या थांबवल्या. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा मोठा अपघात घडला असता.
हेही वाचा : गुगलच्या ‘गंदी बात’मुळे नापास झालो, पठ्ठ्याची नुकसानभरपाईसाठी थेट न्यायालयात धाव व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद हा ट्रक सिमेंटच्या पोत्याने भरलेला होता. अशा स्थितीमध्ये त्याचा ब्रेक फेल झाला. चालकाने प्रसंगावधान राखत हॅन्ड ब्रेकच्या मदतीने हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. मात्र त्यानंतर हॅन्ड ब्रेक देखील निकामी झाला आणि हा ट्रक महामार्गावर धावू लागला. हा थरात मोबाईलमध्ये कैद झाला आहे.