जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तू खूप मोठा झालास का?' 3 मित्रांमध्ये झाली वादाला सुरुवात, काही क्षणात पडला एकाचा मृतदेह

'तू खूप मोठा झालास का?' 3 मित्रांमध्ये झाली वादाला सुरुवात, काही क्षणात पडला एकाचा मृतदेह

'तू खूप मोठा झालास का?' 3 मित्रांमध्ये झाली वादाला सुरुवात, काही क्षणात पडला एकाचा मृतदेह

रागात संपवली मैत्री, बोलता बोलता मित्रालाच चाकूने भोसकलं…

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरावती, 02 ऑगस्ट : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान, गुन्ह्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक भयंकर हत्येचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मित्रांनी एका मित्राची क्षुल्लक कारणावरून चाकूने हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री मित्रानेच मित्राची हत्या केली. पंकज गोकूळ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तर धीरज विश्वासराव ठाकरे आणि सागर खरड अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि यात धीरज आणि सागरने पंकजला चाकूने भोसकलं. यावेळी इतर मित्रांनी पंकजला तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता तिथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. पुण्यात माणूसकीशी खेळ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह 3 दिवस रुग्णवाहिकेतच पडून धीरज आणि सागरने पंकजला भेटण्यासाठी शोभानगर इथल्या एका पानटपरीवर बोलावलं. तिथे त्यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरून बाचाबाची झाली. यामध्ये पंकजने ‘तू खूप मोठा झालास का?’ असा आवाज चढवला. यावर रागात येत धीरज आणि सागरने पंकजला चाकूने सपासप वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलिसांनी चौकशी केली असता धीरज आणि सागरची नावं समोर आली. यानंतर पोलीस पथकाने त्यांचा शोध घेतला आणि दोघांनाही अटक केली आहे. धीरज आणि सागरविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात