मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या बॅगेत सापडली Lipstick, शिक्षकाने रॉड-पाईपने केली बेदम मारहाण

धक्कादायक! कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या बॅगेत सापडली Lipstick, शिक्षकाने रॉड-पाईपने केली बेदम मारहाण

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथे प्रबोधन विद्यालयात शिकणाऱ्या 11वीच्या विद्यार्थिनीला दुपारच्या सुट्टीत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथे प्रबोधन विद्यालयात शिकणाऱ्या 11वीच्या विद्यार्थिनीला दुपारच्या सुट्टीत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथे प्रबोधन विद्यालयात शिकणाऱ्या 11वीच्या विद्यार्थिनीला दुपारच्या सुट्टीत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

अमरावती, 10 जानेवारी : सध्या महिलांच्या बॅगेत सहज मेकअपच्या वस्तू सापडतील. अशीच एक लिपस्टिक कॉलेजमधील मुलीच्या बॅगेत सापडल्याने शिक्षकांकडून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथे प्रबोधन विद्यालयात शिकणाऱ्या 11वीच्या विद्यार्थिनीला दुपारच्या सुट्टीत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. प्रबोधन विद्यालयातील शिक्षक नरेंद्र गोंडाणे यांनी काही प्रश्नांची विचारणा करून विद्यार्थिनींचे दप्तर तपासले असता त्यामध्ये लिपस्टिक आढळल्याने शिक्षकाचा पारा चढला आणि विद्यार्थीनींना मारहाण करण्यात आली आहे.

विद्यार्थिनी आणि तिच्या मैत्रिणींना शिक्षकांनी चक्क रॉड आणि पाइपने पाठीवर, पायावर बेदम मारहाण केली आहे. यामुळे तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या अंगावर व्रण उठले आहेत. या सगळ्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विधार्थिनीने पालकांनासोबत घेऊन याविषयी दर्यापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या सगळ्या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या शिक्षकांची आणि इतर विद्यार्थ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

इतर बातम्या - मांजरीला वाचवण्यासाठी आज्जीने नातवाला 5व्या मजल्यावर लटकवलं, पाहा Shocking Video

मुंबईत आईची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे, दागिने विकून मैत्रिणीवर उधळले पैसे

घरात किरकोळ वाद झाल्यानंतर तो राग मनात ठेवून मुलानेच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसंच हत्या केल्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी क्रूर मुलाने मृतदेहाचे तीन तुकडे करून ते पाण्याने धुतले. त्यानंतर बाईकच्या साहाय्याने हे तुकडे मुंबईतील (Mumbai) विविध भागांत फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सोहेल शेख याला ताब्यात घेतलं आहे.

मुंबईतील विद्याविहार इथं 30 डिसेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असल्याने पोलिसांना अनेक दिवस महिलेची ओळख पटत नव्हती. मात्र याप्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे. आईने फ्रीज वाजवणे बंद न केल्याचा राग मनात धरून मुलानेच आईची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.ट

इतर बातम्या - VIDEO: दानवे-महाजनांसमोर भाजप कार्यकर्त्यांचा मोठा राडा, शाई फेकत केली घोषणाबाजी

First published:

Tags: Amravati