जळगाव, 10 जानेवारी : जळगावच्या भाजप जिल्हाध्यक्ष निवडणुकीत मोठा वाद झाल्याचं समोर आलं आहे. रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस सुनिल नेवे यांना मारहाण करण्यात आली तर सुनील नेवे यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. दोन घटांनी घोषणाबाजी करत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून शाई फेक केली. आज केंद्रीय राज्य मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थिती जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्षांची निवड होत होती. निवड प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. यात हाणामारी झाली आहे. भुसावळ शहराध्यक्ष निवडीवरून हा वाद झाला. भुसावळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले, त्यावेळी हा गोंधळ झाला. यात भाजपचे सरचिटणीस सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आली आहे. सुनील नेवे यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्यांचा राडा सुरू झाल्यानंतर रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन हे सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळाले. या दरम्यान, दानवे आणि त्यांचे कार्यकर्ते सभेतून निघून गेल्याची माहिती मिळत आहे तर गिरीश महाजन व्यासपीठावर सगळ्यांना शांत करण्याचं आव्हान करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
VIDEO: दानवे-महाजनांसमोर भाजप कार्यकर्त्यांचा मोठा राडा, शाई फेकत केली घोषणाबाजी@BJP4Maharashtra @girishdmahajan @ShivSena @rautsanjay61 pic.twitter.com/DJiQytCFWq
— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) January 10, 2020
काय आहे वाद भुसावळात भाजपा शहराध्यक्षपदाची निवड बेकायदेशीररित्या झाल्याने भाजप पदाधिकारी नाराज आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे आरोप होत आहे. भुसावळ शहराध्यक्ष निवडीसाठी 11 जण इच्छुक होते. इच्छुकांपैकी कोणाचीही निवड न झाल्याने संताप झाला आहे. यावरूनच आज जिल्हाध्यक्ष निवडीत हा वाद झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

)







