जन्मदेणाऱ्या बापाच्या डोक्यात 2 वेळा घातला दगडी वरवंटा, खुनी मुलाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर

जन्मदेणाऱ्या बापाच्या डोक्यात 2 वेळा घातला दगडी वरवंटा, खुनी मुलाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर

आज सकाळी मुलाने आपल्या 63 वर्षीय वडिलांच्या डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

  • Share this:

अमरावती, 22 सप्टेंबर : हल्लीची तरुणाई रागीट स्वभावाची आहे हे अनेक घटनांमधून समोर आलं आहे. पण रागात वडिलांचीच हत्या केल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परसोडी इथं आज सकाळी मुलाने आपल्या 63 वर्षीय वडिलांच्या डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धम्मदीप काळे असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आपले वडील रामकृष्ण काळे यांच्यासोबत सकाळी घरीच वाद घातला. नंतर हा वाद इतक्या टोकाला गेला की त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात दोन वेळा दगडी वरवंटा घातला. शुल्लक कारणावरून झालेल्या या वादाचा शेवट खुनापर्यंत झाल्याने सगळं शहर हादरलं आहे.

ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर दीपिकाला समन्स बजावणार का? NCB ने दिली माहिती

डोक्यात गंभीर जखमा झाल्यामुळे वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या आणि गावकऱ्यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तात्काळ दत्तापूर पोलिसांना पाचारण केलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असू त्यांनी आरोपी मुलाला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात येऊ शकते Good News, राज्य सरकार करणार महत्त्वाची घोषणा

दरम्यान, यावेळी आरोपी मुलगा धम्मदिप हा मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. धम्मदिप विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थऴावरून वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 22, 2020, 1:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या