मुंबई, 22 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्स कनेश्नवर NCB चौकशी करत आहे. या तपासामध्ये बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची नावं समोर येत आहेत. बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण हीचं देखील या तपासात नाव समोर आलं आहे. यानंतर आता NCB ने दीपिकाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यात आधी करिश्माची चौकशी करण्यात येईल त्यानंतर गरज पडल्यास दीपिकाला समन्स बजावण्यात येईल असं NCB नं म्हटलं आहे. दीपिका ही सध्या गोव्यामध्ये तिच्या सिनेमाचं शूट करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे NCB सगळ्यात आधी करिश्माची चौकशी करणार आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) अशी नावं समोर आली आहेत. त्यापैकी सर्वात धक्कादायक आणि सर्वात मोठे नाव म्हणजे दीपिका पादुकोण. यावेळी दीपिकाचे ड्रग्ज चॅटही समोर आले आहेत. ‘चतुरस्त्र कलावंताला मुकलो’ मुख्यमंत्र्यांनी वाहिली आशालता यांना श्रद्धांजली समोर आलं दीपिकाचं ड्रग्ज चॅट दीपिका पादुकोणचं जया साहाची कंपनीची मॅनेजर करिश्मासोबत ड्रग चॅट समोर आलं आहे. यामध्ये NCB कडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या चॅटमध्ये दीपिका आणि करिश्मा डॅग्जविषयी बोलत होते. यामध्ये दीपिका करिश्माला विचारत होती की, ‘तुझ्याकडे माल आहे का’. याच्या उत्तरात करिश्मा म्हणते की- ‘हो… पण घरी आहे. मी आता वांद्रेला आहे…’ यावर करिश्मा कोणा अमितचं नाव घेते आणि म्हणते की मी अमितला पाठवू शकते. यावर दीपिका म्हणाली- ‘हो, प्लीज.’ काही वेळानंतर करिश्मा म्हणाली की, ‘अमित घेऊन येत आहे.’ यावर दीपिका विचारते - ‘हॅश आहे का?’ पण त्यावर करिश्मा म्हणते की ‘हॅश नाही गांजा आहे.’ मराठा आरक्षणासंदर्भात येऊ शकते Good News, राज्य सरकार करणार महत्त्वाची घोषणा बॉलिवूडमधलं हे धक्कादायक ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर NCB ने मंगळवारी जया साहा, तिच्या कंपनीची मॅनेजर करिश्मा आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी हिला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे आजच्या चौकशीत काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर श्रद्धा कपूरशिवाय 3 अभिनेत्रींच्या ड्रग चॅटसुद्धा समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.